actor Shaheer Sheikh and Ruchika Kapoor welcome second girl baby the name was revealed SAKAL
मनोरंजन

Shaheer Sheikh- Ruchika Kapoor Baby: 'कृष्ण' साकारणारा अभिनेता पुन्हा झाला बाबा! दुसऱ्या मुलीचं केलं स्वागत... नाव केलं उघड

शाहीर शेखला दुसऱ्यांदा मुलगी झाली आहे. त्याने सोशल मीडियावर मुलीचं नाव सांगितलंय

Devendra Jadhav

Shaheer Sheikh- Ruchika Kapoor Baby News: महाभारत मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता शाहीर शेख हा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शाहीरच्या आयुष्यात आनंदाची बातमी आलीय. शाहीर दुसऱ्यांदा बाबा झालाय. शाहीरची पत्नी रुचिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. याशिवाय या दोघांनी मुलीचं नाव सुद्धा सर्वांना सांगितलंय.

हे ठेवलं शाहीर - रुचिकाने मुलीचं नाव

शाहीरची पत्नी रुचिका हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रुचिकाने एक फोटो शेअर करून तिच्या मुलीचं नावही उघड केले आहे.

रुचिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिची पहिली मुलगी अनया तिच्या लहान बहिणीचे लाड करताना दिसत आहे.

या फोटोसोबतच अभिनेत्याच्या पत्नीने तिच्या दुसऱ्या मुलीचे नावही उघड केले आहे. पोस्टचे कॅप्शन वाचले - बहीण असण्यासारखी दुसरी सर्वात चांगली गोष्ट नाही. अनया आणि कुदरत.

चाहत्यांनी केलं अभिनंदन

तीन वर्षांनंतर शाहीर - रुचिका पुन्हा आई - बाबा झाले आहेत. या गुड न्यूजबद्दल कमेंट करून अनेकांनी या दोघांंचं अभिनंदन केलं आहे . रुचिकाने फोटोमध्ये तिच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा मात्र उघड केलेला नाही.

रुचिकाने मुलीला कधी जन्म दिला याबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण ही आनंदाची बातमी ऐकून त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत.

शाहीरचे आगामी चित्रपट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, टीव्हीनंतर शाहीर शेख लवकरच क्रिती सेनन स्टारर 'दो पत्ती' या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्याने शूटिंगदरम्यान काढलेला एक बीटीएस फोटोही शेअर केला आहे. हा चित्रपट २०२४ ला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT