actor shailesh lodha slams on taarak mehta ka ooltah chashmah show prodcuer said actor is bigger than produce sakal
मनोरंजन

Shailesh Lodha: हे निर्माते नाही, व्यापारीच! 'तारक मेहता' फेम शैलेश लोढांकडून पुन्हा टीका..

शैलेश लोढा यांनी अखेर दिले 'तारक मेहता' सोडल्याचे स्पष्टीकरण..

सकाळ डिजिटल टीम

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही घरोघरी प्रसिद्ध आहे. या मालिकेशी संबंधित सर्व कलाकारही प्रत्येक घराघरांत ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचाच एक भाग असलेले अभिनेते शैलेश लोढा देखील आज प्रत्येक घराघरांत ओळखले जातात.

त्यांच्या अभिनयामुळे लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. त्यांनी मालिका सोडल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर बऱ्याच चर्चाना उधाण आलं. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली. गेली 15 वर्षाहूं अधिक काळ ते या मालिकेत 'तारक मेहता' ही भूमिका साकारत होते. पण त्यांची निर्मात्यांवर असलेली नाराजी हळू हळू बाहेर येत गेली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मालिका सोडण्याबाबत भाष्य केले.

(actor shailesh lodha slams on taarak mehta ka ooltah chashmah show prodcuer said actor is bigger than produce)

या कार्यक्रमात कोणीतरी त्यांना विचारले की तुम्ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका का सोडली? यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘जे लोक इतरांच्या कौशल्यातून, त्यांचं टॅलेंट विकून पैसे कमावतात ते कधीच एक प्रतिभावान व्यक्ती होऊ शकत नाहीत.

पुढे ते म्हणाले, 'जगातील कोणताही निर्माता कलाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. ते व्यापारीच असू शकतात. हे आपण समजून घेतले पाहिजे. मी एक कवी आणि अभिनेता आहे, जेव्हा कोणीही माझ्या अभिनयावर आणि कवी असण्यावर स्वतःचे वर्चस्व गाजवेल तेव्हा मी नक्कीच आवाज उठवीन.’ अशी सडेतोड टीका त्यांनी केली.

शैलेश लोढा हे गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा काम करत होते. यात त्यांनी तारक मेहताची भूमिका साकारली होती. पण २०२२ मध्ये त्यांनी अचानक ही मालिका सोडली. शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी आता अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : संरक्षण नाही तर 'या' क्षेत्रावर होणार सर्वाधिक खर्च! शेती आणि शिक्षणावर किती खर्च? शेतीसाठी पैसे वाढले?

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Union Budget 2026: पुढील दशक खेळाडूंचे! क्रीडा क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Union Budget 2026: रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर

SCROLL FOR NEXT