actor Sharman joshi father Guajarati actor Arvind joshi passed away 
मनोरंजन

अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचे निधन  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रख्यात अभिनेता शर्मन जोशी  याचे वडिल अरविंद जोशी यांचे शुक्रवारी सकाळी वार्धक्यानं निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्यानं शर्मनवर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्याचे सांत्वन केले आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ट्विट करत अरविंद यांच्या निधनाची माहिती दिली. ‘भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मला सांगताना दु:ख होत आहे की, अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन झाले आहे,’ असं म्हणत त्यांनी  त्यांना श्रध्दांजली वाहिली.  अरविंद जोशी यांनी गुजरातीमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केले होते.

गुजराती नाटकांमधून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गुजरातीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी काम केलं. इत्तेफाक , शोले,  अपमान की आग, खरीदार’, ठिकाना, नाम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून काम करताना वेगळा ठसा उमटविला होता. त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT