actress shilpa shetty husband raj kundra  Team esakal
मनोरंजन

माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आता माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

युगंधर ताजणे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आता माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या विरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि त्याचा पती राज कुंद्रा या दोघांच्याही विरोधात माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारचे वार्तांकन केलं आहे. त्यामुळे आता त्या वार्तांकनाच्या विरोधात शिल्पा आक्रमक झालीयं. (Actor Shilpa Shetty filed defamation suit Bombay High Court yst88)

शिल्पाच्या बाजूनं अनेक बॉलीवूड कलाकारांनी यापूर्वी आपली मतं व्यक्त केली होती. एएनआयनं व्टिटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, शिल्पानं 29 माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात काही पत्रकारांचाही समावेश आहे. ज्या माध्यमांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या विरोधात आपण न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही शिल्पानं सांगितलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज कुंद्रा आणि त्याचे पॉर्नोग्राफी प्रकरण चर्चेत आले आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या माध्यमांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे त्या माध्यमांनी बिनशर्त माफी मागावी. आणि 25 कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणी शिल्पानं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Empire: मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला; भोसले घराणे संतापले, कुणावर केले गंभीर आरोप?

Special Train For Holi : होळीनिमित्त पुण्याहून विशेष रेल्वे धावणार; एक लाखाहून अधिक प्रवाशांची होणार सोय

Chhatrapati Shivaji Maharaj: दक्षिण काशीत शिवरायांचे राजपत्र; पैठणच्या बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयात जतन

SSC Board Exam : सीसीटीव्हीविना आता दहावी परीक्षा; राज्य मंडळासमोर कॉपीमुक्तीचे आव्हान

सूर्यकुमार यादवने मोडला रोहितचा विश्वविक्रम; विराट, धोनी जवळपासही नाहीत

SCROLL FOR NEXT