Actor Shreyas Talpade participates in cleanliness drive Swachhata Hi Seva Campaign at Versova Chowpatty  Esakal
मनोरंजन

Swachhata Hi Seva Abhiyan: विसर्जनानंतर श्रेयस तळपदेकडून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेसाठी श्रमदान!

Vaishali Patil

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीच्या एक दिवसापुर्वी मोदी सरकार देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबवत आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी श्रमदान’ कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत आहे यात सामान्य नागरीकांसह अनेक राजकिय नेते आणि कलाकार मंडळींनीही सहभाग घेतला.

सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते.

या श्रमदानासाठी पीएम मोदींनी एक तारीख, एक तास, एक साथ असा नारा दिला आहे. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. असं त्यांनी सांगितलं. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणांची निवड करण्यात आली आहेत.

स्वच्छता ही सेवा हे अभियानाला देशवासीयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. तर मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग आणि एकता मंच यांच्या विद्यमाने स्वच्छता ही सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी सामान्य देशवासीयांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील सहभाग घेतला होता. यात मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे, नील नितीन मुकेश यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आणि समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केली.

यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील शेकडो नागरिक देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Video Viral: क्रिकेटच्या मैदानात बाप-लेक भिडले! नबीच्या पहिल्याच चेंडूवर मुलानं मारला खणखणीत सिक्स

Ahmedabad Plane Crash: ''इंधन पुरवठा नियंत्रकात त्रुटी नाही'', एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर

Walmik Karad: वाल्मिकच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला पण मालमत्तेचं काय होणार? उज्ज्वल निकम केस लढणार का?

ENG vs IND: इंग्लंडच्या ओपनर्सला का फैलावर घेतलं? शुभमन गिलने केली पोलखोल; त्यांचा रडीचा डाव जगासमोर आणला

SCROLL FOR NEXT