Actor Siddhartha Jadhav new look for lagnakallol marathi movie 
मनोरंजन

सिद्धार्थ जाधव वधूच्या शोधात !

सकाळ वृत्तसेवा

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी चित्रपटासाठी आहे. यात तो वधू-वर सूचक केंद्राचा बॅच लावून दिसत आहे, यावरून तो वधूच्या शोधात असल्याचे कळतेय. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मारुती राजाराम पाटीलची भूमिका साकारत आहे. मुळात चित्रपटाचे नाव 'लग्नकल्लोळ' असल्याने यात लग्न, धमाल, गोंधळ असा सगळा मसाला बघायला मिळणार आहे. मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा दिलशाद शेख यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले आहे. डीओपीचे काम दिलशाद व्हीए यांनी पाहिले आहे. सध्या या चित्रपटाचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरु असून वर्षाअखेरीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: पावसामुळे उद्या शाळांना सुट्ट्या; ठाणे, कल्याणमध्ये सुट्टी जाहीर, मुंबईचं काय?

AI Project Revive : आता मृत प्रियजनांशी साधता येणार संवाद , AI ची कमाल, तंत्रज्ञानाबाबत ऐकून वाटेल आश्चर्य

Heavy Rainfall: निसर्ग कोपला, बळीराजाच्या डोळ्यात पाणी; पिकांच्या जागी साचला गाळ, नद्या नाले फुगले

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरची डोकेदुखी तीन खेळाडूंमुळे वाढली, एका जागेसाठी चुरस रंगली! पुन्हा एकदा ऑलराऊंडर बाजी मारणार?

Weekly Love Horoscope : शुक्र-बुध ग्रहाची युती! 'या' 3 राशींच्या लोकात वाढेल प्रेम अन् 'या' 2 राशींच्या नात्याला त्रास

SCROLL FOR NEXT