Actor Sonu Sood Mobile Tower Installed In A Village
Actor Sonu Sood Mobile Tower Installed In A Village  
मनोरंजन

मुलांच्या मदतीला सोनू सूद आला धावून ; ऑनलाइन अभ्यासासाठी बसवला मोबाईल टॉवर

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांना मोबाईल रेंज संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा प्रभाव याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. यामुळे त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वेगवेगळ्या सामाजिक कामासाठी प्रसिध्द असणा-या अभिनेता सोनू सुदच्या मदतशील स्वभावाचा प्रत्यय  मोरनी गावातील विद्यार्थ्यांना आला आहे.

चंदीगडमधील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी स्मार्टफोन्सचे वाटप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने आता एका गावात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासात येणारी मोबाईल नेटवर्कची अडचण सोडवण्यासाठी  एक मोबाईलचा टॉवरच बसवून दिला आहे. या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासात सतत नेटवर्कची अडचण येत असल्याने या दोघांनी गावात थेट मोबाईल टॉवरच उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेटवर्कमध्ये खंड पडू नये यासाठी त्यांनी इंडस टॉवर्स आणि एअरटेलच्या मदतीने गावात मोबाईल टॉवर उभारला आहे. चंदीगडमधील करण गिल्होत्रा या मित्राच्या मदतीने सोनू सूदने मोरनी या गावात हे सामाजिक काम केले आहे. 

मोरनी येथील दपना गावातील एक चिमुकला इतर लहान मुलांना ऑनलाईन अभ्यासासाठी नेटवर्क येत नसल्याने ते मिळवण्यासाठी एका झाड्याच्या फांदीवर जाऊन बसला होता. असा एक हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या युजरने अपलोड केला होता त्याने तो सोनू सूद आणि करन गिलहोत्रा यांना ट्विटरवर टॅग केला होता. या व्हिडिओने या दोघांचे लक्ष वेधून घेतले होते.

 याबाबत अधिक माहिती देताना सोनू सूद म्हणाला, “मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत त्यामुळे चांगल्या भविष्यासाठी त्यांना समान संधी मिळणं गरजेचं आहे. कोणीही आपल्यातील पूर्ण क्षमता वापरण्यापासून वंचित राहू नये यासाठी मी अशी आव्हानात्मक कामं स्विकारतो आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील छोट्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाकरीता त्यांच्या गावात मोबाईल टॉवर उभारण्यास मदत केल्याचा मला अभिमान आहे.”  देशात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून सोनू सूद सातत्याने गरजवंतांना विविध प्रकारे मदत करीत आहे. त्याचे मदत कार्य सुरु आहे. 

“मूलभूत शिक्षण घेण्यासाठी मुलांना अशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहून वाईट वाटते.  अशा परिस्थितीत आम्ही आमच्या ताकदीचा वापर अशा लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी करु. या गावातली परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर आम्ही इंडस टॉवर्स आणि एअरटेल कंपनीशी बोललो त्यानंतर त्यांनी टॉवर उभारण्यासाठी आम्हाला मदत केली. त्यांनी गावाचं सर्वेक्षण केलं आणि टॉवर कुठे उभारायचा याची जागा निश्चत केली. इंडसने आम्हाला गावात टॉवर उभा करुन त्यावर अॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर उभं करुन दिलं.  असे करण गिल्होत्रा यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT