actor subodh bhave ladies special new show bus bai bus on zee marathi sakal
मनोरंजन

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या.. सुबोध भावे घेऊन येतोय महिलांसाठी राखीव बस..

'झी मराठी' वाहिनीवर 'बस बाई बस' हा नवा कार्यक्रम लवकरच रंगणार आहे..

नीलेश अडसूळ

bus bai bus : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा एकमेव अभिनेता सुबोध याचे चरित्र अभिनेता असं समीकरण झालं आहे. सुबोधनं यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अनेक मालिकांमध्येही सुबोधने प्रमुख भूमिका केल्या आहेत. आता एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन सुबोध भावे छोट्या पडद्यावर येत आहे.. (actor subodh bhave is bringing a new ladies special show bus bai bus on zee marathi)

याआधी त्याने केलेली झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड गाजली, ह्या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतोय. आता जवळपास ३ वर्षानंतर सुबोध भावे झी मराठीवर पुनरागमन करतोय. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणं ज्याची ख्याती आहे असा सुबोध भावे स्त्रियांसाठी 'लेडीज स्पेशल' बस घेऊन येतोय. या कार्यक्रमाचे नाव 'बस बाई बस' असे आहे.

नुकताच या नव्या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार हे काही कळलेल नाही. यामध्ये काही महिला बस मध्ये चढताना दिसत आहेत यावेळी सुबोध म्हणतो, 'या कुठे चालल्या आहेत माहितीय? मी घेऊन येतोय महिलांसाठी राखीव बस..' त्यामुळे या कार्यक्रमात काही धम्माल असणार एवढं नक्की.. पण ते जाणून घेण्यासाठी २९ जुलै ची वाट बघावी लागणार आहे. तेव्हा एक नवाकोरा कार्यक्रम "बस बाई बस" २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वा. झी मराठीवर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: सूर्यकुमार यादवने जिंकला टॉस; संजू सॅमसन-बुमराहला मिळाली संधी? पाहा प्लेइंग-११

Central Railway: फुकट्यांना मध्य रेल्वेचा दणका! ५ महिन्यांत १७ लाख प्रवासी पकडले, १०० कोटींचा दंड

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Latest Marathi News Updates Live: शॉर्टसर्किटमुळे बंगल्यात आग, आठ जणांची सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT