मनोरंजन

हॅम्लेट साकारणे कुणाचेही काम नव्हे

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - अभिनय कारकिर्दीमधील हॅम्लेटची भूमिका सर्वोत्कृष्ट भूमिकांमधील एक आहे. शेक्‍सपियरची धीरगंभीर भाषा, मानवी मनाचे असंख्य कंगोरे, कालातीत व्यक्तिरेखा हॅम्लेट साकारणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. फक्त कलाकारच नव्हे, तर उत्तम व्यवस्थापन लागते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रित केलेले हे नाटक प्रत्येक प्रयोगागणिक हॅम्लेट गवसत आहे, असे प्रतिपादन अभिनेता सुमित राघवन यांनी केले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंगतर्फे ‘हॅम्लेट एक शिवधनुष्य’ या प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. वामन पंडित यांनी मुलाखत घेतली. वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कलाकारांचा सत्कार केला.

तुषार दळवी म्हणाले, या नाटकासाठी आम्ही सर्वच कलाकार चंदू कुलकर्णीचे बोट पकडून पुढे गेलो. पल्लेदार वाक्‍यांची भाषा बोलताना व्यवधान सांभाळावे लागले. तीन महिने तालीम सुरू होती. शब्दोच्चार, बाराखडी आणि संवादफेकीवर भरपूर मेहनत घेतली.

फणसोप हे माझे आजोळ आहे, येथे प्रयोग करताना खूपच आनंद होतोय, असे अभिनेता सुनील तावडे म्हणाले. नाटकातील तरुण कलाकारांसोबत काम करताना खूप ऊर्जा मिळाली. वेगळ्याच शब्दावर जोर देऊन संवादफेक शिकता आली. या नाटकाने मी अभिनय क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले.

अभिनेत्री मुग्धा गोडबोले म्हणाल्या, मला संवाद कमी आहेत, पण प्रत्येक पात्रासोबत माझ्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. त्या-त्या वेळची मानसिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आयुष्यभर हे नाटक मी विसरू शकत नाही.

नाट्यगृहाच्या व्यवस्थेवर अवलंबून न राहता सर्व व्यवस्थेचा संच आम्ही सोबत ठेवला आहे. २२ कलाकारांसह तंत्रज्ञ, सहायकांचा ८० जणांचा चमू असून अवाढव्य सेट आहे.
- श्रीपाद पद्माकर
, निर्माता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT