suniel shetty  Sakal
मनोरंजन

Suniel Shetty: 'माझ्या कुटुंबाविरुद्ध काहीही...', सोशल मीडिया युजर्सवर भडकले सुनील शेट्टी

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. सुनील त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर फारसा बोलत नसला तरी. तो स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियाच्या चर्चेपासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतो. नुकतेच सुनील शेट्टीने त्याच्या एका भीतीचा खुलासा केला आहे.

सुनील शेट्टीने नुकतेच द रणवीर शोमध्ये सांगितले की, "आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोपनीयता नाही, यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होते. एक वाक्य 15 वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आहे, 15 वेगवेगळ्या प्रकारे सादर केले आहे आणि त्यामुळे आपले जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे मला मोकळेपणे बोलण्याचीही भीत वाटते.”

सुनील शेट्टीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही गोष्टीवर मतं मांडताना तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता. तसेच माझ्या कुटुंबाला आणि मुलीला सोशल मीडियावर चांगले-वाईट बोलले जाते तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. मी जुन्या विचारांचा आहे."

हे सर्व पाहून त्याला खूप वाईट वाटते. मात्र, हे सर्व पाहून आपण गप्प बसणार नसल्याचेही सुनील शेट्टीचे म्हणणे आहे. सुनील शेट्टी म्हणाला ट्रोलिंगबद्दल शांत बसणार नाही. पुढं तो म्हणाला, “ मी शेट्टींचा मुलगा आहे हे तुम्हाला माहितीये. मी कधीच शांत बसणार नाही.

सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा वेब शो हंटर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याला लोकांचा संमिश्र प्रतिसादही मिळत आहे. याशिवाय हेरा फेरी 3 त्याच्यासोबत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत परेश रावल आणि अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हेरा फेरी ही हिट फ्रँचायझी आहे. अशा परिस्थितीत हा कॉमेडी-ड्रामा चित्रपटही लोकांची मने जिंकेल, अशी पूर्ण आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT