Suvo Chakraborty  
मनोरंजन

फेसबुक लाइव्ह करताना अभिनेत्याने दिला आत्महत्येचा इशारा

वर्षभरापासून मिळालं नाही काम

स्वाती वेमूल

'मंगल चंडी', 'मनसा' यांसारख्या टीव्ही शोमध्ये छोट्या भूमिका साकारणारा अभिनेता सुवो चक्रवर्ती Suvo Chakraborty याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा इशारा दिला. ८ जून रोजी सुवोने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने वर्षभरापासून काम मिळत नसल्याचं दु:ख व्यक्त केलं. यावेळी बोलत असताना सुवोने आत्महत्येचा इशारा दिल्याने त्याच्या मित्रांनी ताबडतोब पोलिसांना फोन करून कळवलं. पोलिसांनी सुवोच्या घरी धाव घेत तो सुरक्षित आणि सुखरुप असल्याचं स्पष्ट केलं. (actor Suvo Chakraborty threatens to end his life during Facebook live)

"अशा घटनांना आम्ही फार गंभीररित्या घेतो. एका फेसबुक युजरकडून काल रात्री आम्हाला कॉल आला होता आणि त्याने संबंधित फेसबुक लाइव्हबद्दल सांगितलं. घटनेची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्वरित सुवोच्या घरी धाव घेतली. त्याच्या बहिणीशी आम्ही बोललो."

कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांमुळे अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. ऑगस्ट २०२० पासून हातात काहीच काम नसल्याचं सुवोने सांगितलं. माझ्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असलं तरी व्यावसायिकदृष्ट्या त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असं तो म्हणाला. काही महिन्यांपूर्वीच सुवोच्या वडिलांचं निधन झालं होतं. या संपूर्ण परिस्थितीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. 'I Quit' असं लिहिल्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपवणार असल्याचा इशारा त्याने लाइव्हदरम्यान दिला होता.

सुवोच्या या लाइव्हनंतर घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी पोलिसांची मदत घेतली. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्येच सुवोची 'मंगल चंडी' ही मालिका बंद झाली होती. त्यानंतर त्याला कोणतंच काम मिळालं नाही. लॉकडाउनमुळे अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT