actor suyash tilak talk about his relatiobship with actress akshaya deodhar and break up  sakal
मनोरंजन

Suyash Tilak: अक्षया सोबतच्या ब्रेकअपनंतर अखेर सुयश बोललाच.. म्हणाला, तिच्या आयुष्यात दुसरं कुणी..

आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही.. अखेर सुयशने मनातली खंत व्यक्त केलीच..

नीलेश अडसूळ

suyash tilak and akshaya deodhar breakup: मराठी मनोरंजन विश्वात कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, प्रेम, लग्न याबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. गेल्या वर्षात सर्वात जास्त चर्चा झाली ती सुयश - अक्षया यांच्या प्रेमाची.

अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया देवधर अनेक वर्ष रिलेशन मध्ये होते. ते लग्न करणार अशीही चर्चा होती. पण अचानक त्यांच्या नात्यामध्ये विस्तव पडला आणि दोघांनीही आपापले जोडीदार निवडून लग्न केले.

अक्षय आणि सुयशच्या ब्रेकअप ची चर्चा बरीच झाली पण नेमकं काय झालं, याबाबत त्या दोघांनीही मौन बाळगलं होतं. पण आता एका मुलाखतीमध्ये सुयशने अक्षया सोबतच्या ब्रेकअप बाबत भाष्य केले आहे.

(actor suyash tilak talk about his relatiobship with actress akshaya deodhar and break up )

सुयश आणि अक्षया यांच्या ब्रेकअप ला साधारण दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. पण त्यावर कुणीही कधीही बोललं नाही. सुयशने दोन वर्षांपूर्वी आयुषी भावे सोबत लग्नगाठ बांधली तर अक्षयानेही हार्दिक जोशी सोबत लग्नं केले. पण अखेर इतक्या काळाने सुयश बोलता झाला आहे.

एका मुलाखतीत सुयशला अक्षयाबरोबरच्या नात्याबाबत आणि ब्रेकअप बाबत विचारण्यात आलं. त्यावर सुयश म्हणाला, ''अक्षयाआधी मी एक अनुभव घेतला होता. माझ्याबरोबर हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. पण अक्षयाबरोबर माझं नातं खूप चांगलं होतं. आमची मैत्री चांगली होती. शिवाय आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेत होतो.''

''तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आहे हे तिला जेव्हा जाणवलं तेव्हा तिने मला मैत्रीच्या नात्याने सगळं सांगितलं. तिच्या या निर्णयाचा मी आदर केला. मला हे नातं सोडून पुढे जावं लागलं.''

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढे तो म्हणाला, ''एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर एकच व्यक्ती नातं ताणून धरत असेल तर त्या नात्याची दिशा बदलते. पण तुम्हाला ते त्यावेळी जाणवत नाही. मलाही तेव्हा ते जाणवलं नव्हतं. पण यासाठी मला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवलं नाही.''

''तिच्या आयुष्यात माझा प्रवास तिथवरच होता. आम्ही समजुतदारपणे वेगळे झालो. आजही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही असं काहीच नाही”. असे सुयश या मुलाखतीत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT