actor swapnil joshi insult ashok saraf in chala hawa yeu dya on zee marathi  sakal
मनोरंजन

'चला हवा येऊ द्या'मध्ये अशोक मामांचा अपमान, स्वप्निल जोशीवर होतेय टीका..

'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अशोक मामा आले तेव्हा एक प्रसंग घडला, त्यावरून स्वप्नील जोशीला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

नीलेश अडसूळ

chala hawa yeu dya : गेल्या काही वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम रसिक मनांचं मनोरंजन करत आहे. न थकता,न चुकता कुशल बद्रिके,भाऊ कदम(Bhau Kadam),श्रेया बुगडे(Shreya Bugde),गणेश भारतपुरे,सागर कारंडे,डॉ.निलेश साबळे(Dr.Nilesh Sable) ही टीम रसिकांच्या आनंदासाठी काम करत आहे. याच कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi) देखील सहभागी झाला. या कार्यक्रमाला चाहत्यांची भरभरून पसंती मिळत असतानाच एक नवा वाद समोर आला आहे. या मंचावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अपमान झाल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.

(actor swapnil joshi insult ashok saraf in chala hawa yeu dya on zee marathi)

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) आपल्या 75व्या वाढदिवसानिमित्त 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये आले होते. हा एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा या एपिसोडमधील एक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड खटकली. त्याचं झालं असं की बॉलिवूडच्या हिंदी चित्रपट जुग जुग जिओचे कलाकार देखील या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी आले होते. कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी स्वप्निल जोशी आपल्या खुर्चीतून उठून समोर आला आणि अनिल कपूर यांच्यासोबत बसला. या कृतीतून त्याने त्यांच्या प्रती आदर दाखवला.

पण अशोक सराफ यांच्यासाठी मात्र त्याने असे काहीही केले नाही. अशोक मामांसाठी आयोजित खास भाग असूनही स्वप्नीलने त्यांचा आदर राखला नाही, असे चाहत्यांचे म्हणणे. अशोक मामांसारखा दिग्गज मानू समोर येताच त्याने उठून उभे राहणे अपेक्षित होते मात्र तो त्याच्या खुर्चीत बसून राहिला. हे त्याने अत्यंत चुकीचे वर्तन केल्याची टीका चाहते करत आहेत. यावर काही मिम्सही करण्यात आले आहे. हे प्रकरण जुने असले तरी स्वप्नीलय मात्रा आता चांगलेच ट्रोल केले जात आहे. शिवाय मराठी कार्यक्रमातच मराठी कलाकारांना एक आणि बॉलिवूड कलाकरांना एक अशी वेगळी वागणूक का दिली जाते, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT