actor varun dhawan injury on while shooting vd 18 movie set SAKAL
मनोरंजन

Varun Dhawan: आगामी सिनेमाचं शुटींग करताना वरुणला दुखापत, पोस्ट शेअर करुन दिली माहिती

वरुण धवनला शूटींग करताना दुखापत झाल्याची गोष्ट घडली

Devendra Jadhav

Varun Dhawan Injury News: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता वरुण धवन हा सर्वांचा लाडका अभिनेता. वरुणने आजवर अनेक सिनेमांमधून अभिनेता म्हणून स्वतःची छाप पाडली आहे. अशातच वरुण धवनच्या फॅन्ससाठी चिंताजनक बातमी समोर आलीय.

आगामी सिनेमाच्या सेटवर शूटींग करताना वरुणला दुखापत झाल्याची गोष्ट समोर आलीय. काय झालंय नेमकं. जाणून घ्या.

वरुण धवनला शूटींग करताना दुखापत

वरुण धवन आगामी सिनेमाचं शुटींग करत होता. त्यावेळी शूटींग करताना वरुणच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वरुण हा आगामी चित्रपट VD 18 चे शूटिंग करत असताना हा अपघात झाला.

इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - लोखंडी रॉडला आदळल्याने माझ्या पायाला दुखापत झालंय.

वरुण करतोय या सिनेमाचं शूटींग

या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन कॅलीस करत आहेत. याशिवाय जवान फेम अॅटली आणि मुराद खेतानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात वरुण पूर्ण अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

हा सिनेमा सुपरहिट तमिळ चित्रपट थेरीचा रिमेक आहे. मार्च 2004 पर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हा सिनेमा २०२४ च्या अखेरीस रिलीज होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL vs County Cricket वरून वातावरण तापलं! पीटरसनवर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टिका, 'बस कर आता, मुर्खा...'

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT