varun dhawan and arjun kapoor  Sakal
मनोरंजन

Varun Dhawan: 'तिने आम्हा दोघांना फिरवलं...', 'त्या' मुलीबद्दल जेव्हा वरुण अन् अर्जून कपुरने केला होता खुलासा...

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहेत.

Aishwarya Musale

वरुण धवन आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, वरुण धवनचा जवळचा मित्र आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या त्याच्या बाँडिंगचा एक किस्सा खूप व्हायरल होत आहे. खरे तर दोघांनी एकाच अॅक्टिंग स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. एका शोदरम्यान दोघांनी त्या काळातील एक किस्सा सांगितला. जे ऐकून तुमचे हसू आवरणार नाही.

वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्यातील मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. चाहत्यांनाही त्यांचे बाँडिंग खूप आवडते. साजिद खान आणि रितेश देशमुखचा लोकप्रिय शो यारों की बारात मध्ये या दोघांनी एक मजेदार खुलासा केला आहे. वरुण धवनने सांगितले की, 'त्याच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये एक मुलगी होती. ‘'तिने आम्हाला दोघांना फिरवलं..’

वरुणने सांगितले की, अर्जुनसोबत तिची मैत्री झाली आहे याची त्याला कल्पना नव्हती. कारण तो वर्गात अगदी शांतपणे बसायचा आणि फक्त वरुणशीच बोलायचा. त्यानंतर एका पार्टीदरम्यान त्या मुलीने वरुणला एका संभाषणात सांगितले की, तिचे आणि अर्जुनचे अफेअर होते. त्यानंतर वरुणला वाटले की चांगले मित्र असूनही अर्जुनने त्याला काहीच सांगितले नाही. यावर अर्जुन कपूरची किती मजेशीर प्रतिक्रिया आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

वरुण बोलत असताना अर्जुन म्हणाला की, अॅक्टिंग स्कूलमध्ये वरुण असा होता की तो भेटलेल्या प्रत्येक मुलीसोबत फ्लर्ट करायचा. शो दरम्यान हा किस्सा सांगताना दोन्ही स्टार्सना विचारण्यात आले की कोण जास्त फ्लर्ट करायचं. त्यावर वरुणने अर्जुनाकडे बोट दाखवले. ज्याला अर्जुननेही होकारार्थी उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply Cut: ठाणे जिल्ह्यात ६ तास पाणी पुरवठा बंद, कधी आणि कुठे?

मुख्यमंत्रीही पोहोचले पाटेकरांचा गणपती पाहायला; नेमकं कुठे आहे नाना पाटेकरांचं फार्महाउस?

Latest Marathi News Updates : केडीएमसी प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस!

Gadchiroli Police: गडचिरोलीत तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांची कारवाई; ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Nagpur Cyber Fraud: ‘ऑनलाइन ट्रेडिंग’ पडले भारी; ९ कोटींनी फसवणूक, ७५ गुन्ह्यात २१ कोटी लंपास

SCROLL FOR NEXT