Varun Dhawan, David Dhawan, David Dhawan news, Varun Dhawan news SAKAL
मनोरंजन

David Dhawan: अभिनेता Varun Dhawan च्या वडीलांवर मोठी हृदय शस्त्रक्रिया.. या रुग्णालयात..

गेल्या दोन वर्षांपासून डायबेटिसमुळे दिग्दर्शक डेविड धवन यांची तब्येत ठीक नव्हती

Devendra Jadhav

David Dhawan News: बॉलिवूडला एकापेक्षा एक सरस चित्रपट देणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक म्हणजे डेव्हिड धवन. सध्या डेव्हिड चित्रपट पडद्यापासून दूर असले तरी ते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येतात.

यावेळी डेव्हिड धवन चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची तब्येत. गेल्या दोन वर्षांपासून डायबेटिसमुळे दिग्दर्शक डेविड धवन यांची तब्येत ठीक नव्हती.

पण आता काही मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत, ज्यामध्ये डेव्हिड धवनवर अँजिओप्लास्टी झाल्याचं बोललं जातंय.

(actor Varun Dhawan's father David Dhawan in a private hospital in Mumbai)

डेविड धवन यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मात्र डेव्हिड धवनच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्याच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

डेव्हिड धवनच्या कुटुंबीयांनी अद्याप याबाबत कोणालाच काहीही सांगितलेले नाही. डेव्हिड धवनच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की,

'डेव्हिडची पत्नी लाली धवन, वरुण आणि रोहित शस्त्रक्रियेदरम्यान खूप अस्वस्थ होते. पण आता सर्व काही ठीक आहे. सर्व कुटुंब मिळून डेव्हिड धवन यांची काळजी घेत आहे.

गेल्या वर्षी जूनमध्येही डेव्हिड धवनची तब्येत अचानक बिघडली होती, त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेव्हिडची तब्येत बिघडली तेव्हा वरुण त्याच्या जुग जुग जिओ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता.

त्यानंतर वडील आजारी असल्याची बातमी मिळताच तो चित्रपटाचे प्रमोशन मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये गेला. डायबेटीस मुळे डेव्हिड धवन यांची प्रकृती गेल्या वर्षी बिघडली होती.

माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि शिल्पा शेट्टी यांची आई सुनंदा शेट्टी यांचीही नुकतीच अँजिओप्लास्टी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT