actor vicky kaushal said malvani food and kolhapuri thecha is best in the world in chala hawa yeu dya show sakal
मनोरंजन

Vicky Kaushal: मालवणी जेवण आणि ठेचा म्हणजे.. विकी कौशल मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर विकी कौशलने सांगितलं जगात भारी मालवणी जेवण..

नीलेश अडसूळ

अभिनेता विकी कौशल सध्या बराच चर्चेत आहे. विकी त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत होताच पण कतरिना कैफ बरोबर लग्न केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. सध्या बॉलीवुडमध्ये हवा आहे ती विकीचा आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा'ची. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी सध्या सगळीकडे भेट देत आहेत. याच निमित्ताने विकिने झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' ह्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विकी कौशलने कोल्हापुरी ठेचा आणि मराठमोळ्या जेवणाचे भरभरून कौतुक केले.

(actor vicky kaushal said malvani food and kolhapuri thecha is best in the world in chala hawa yeu dya show)

विकी कौशल आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' च्या प्रमोशनसाठी मराठी कॉमेडी शो चला हवा येवू द्या सेटवर हजेरी लावली. यावेळी विकी कौशलने सांगितले की, मला जॅपनीज, चायनीज पेक्षा मालवणी जेवण खुप आवडतं, जगात लोक म्हणतात ही जेवण भारी, ते जेवण भारी.. पण मी सांगतो, मालवणी जेवण ही बेस्ट आहे. त्या शिवाय बाकरवडी पण माझी आवडती आहे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ठेचा. कितीही बोरिंग जेवणाला फक्त एक तिखट ठेचा असेल तर त्या जेवणाची पूर्ण चवच बदलून जाते,' अशा शब्दात त्याने मराठमोळ्या जेवणाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

या सेटवर मराठी अभिनेत्री रेणूका शहाणे-राणा, अमेय वाघ हे देखील उपस्थित होते. 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट करण जोहरने निर्मित केला असून विकी कौशल पहिल्यांदाच करण जोहर सोबत काम करत आहे. तर शशांक खेतान यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विकी सोबत कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT