Vicky Kaushal
Vicky Kaushal 
मनोरंजन

Vicky Kaushal as Sambhaji Maharaj: अभिनेता विकी कौशल साकारणार संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

सकाळ ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लवकरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शिवाजी पार्क मैदानात मनसेचा दीपोत्सव सुरु आहे.

या दीपोत्सवाचं हे यंदाचं ११ वं वर्ष आहे. याच कार्यक्रमात राज ठाकरेंनी विकीच्या भूमिकेबाबत पहिल्यांदाच माहिती उघड केली. (Actor Vicky Kaushal will play the role of Sambhaji Maharaj Raj Thackeray announcment in MNS Dipotsav)

सलीम-जावेद जाडीची हजेरी

पाच दिवस चालणाऱ्या या दीपोत्सवात दररोज काही सेलिब्रेटी हजेरी लावतात. काल या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध कथालेखक जोडी सलीम-जावेद यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आज अभिनेता विकी कौशल, निर्माता-दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर, राजकुमार हिराणी तसेच निर्माते साजीद नाडियाडवाला यांनी हजेरी लावली. (Marathi Tajya Batmya)

विकी कौशल साकारणार संभाजी महाराज

यावेळी राज ठाकरे यांनी पाहुण्याचं स्वागत करताना अभिनेता विकी कौशलबाबत एक खास बाब उघड केली. राज ठाकरे म्हणाले, "अत्यंत प्रतिथयश कलाकार विकी कौशल यांचा येत्या काळात एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात विकीनं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका साकाली आहे. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी त्यानं खरीखुरी दाढी वाढवली आहे" (Latest Marathi News)

आकाशात फटाक्यांची आतषबाजी

त्यानंतर अखेर या दीपोत्सवात आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. या उपस्थित नागरिकांनी या आतषबाजीचा आनंद लुटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT