Actor Vilas Ujawane Faced Financial Crisis with brain stroke serious illness jaundice hearth problem Friend Seeks Donations  sakal
मनोरंजन

Vilas Ujawane: 'चार दिवस सासूचे'फेम अभिनेते विलास उजवणे देतायत गंभीर आजाराशी झुंज, पोस्ट करत..

विलास उजवणे यांचे प्रकृती गंभीर असून त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

नीलेश अडसूळ

Vilas Ujawane: चार दिवस सासूचे, वादळवाट यांसारख्या प्रसिद्ध मालिका आणि अनेक नाटक, चित्रपट यांच्यामध्ये दमदार भूमिका केलेले मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांच्या एका मित्राने याबाबत सोशल मिडियावर माहिती दिली आहे.

(Actor Vilas Ujawane Faced Financial Crisis with brain stroke serious illness jaundice hearth problem Friend Seeks Donations)

एक काळ असा होता की विलास उजवणे यांच्याशिवाय मालिका विश्व अपूर्ण होते. त्यांनी आजवर अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. पण गेले काही वर्षे ते कुठेच दिसत नव्हते, त्यावेळी त्यांना गंभीर आजाराने ग्रासल्याचे समोर आले होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली ही होती पण आता पुन्हा त्यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. असलेली जमापुंजी पणाला लागल्यानेन आता त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे.

त्यांच्या मित्राने त्यांच्यासाठी आर्थिक आवाहन करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हंटले आहे की. 'गेल्या काही काळापासून अभिनेते डॉ. विलास उजवणे यांची प्रकृती ठीक नाहीये. ते गेल्या सहा वर्षापासून ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजाराशी दोन हात करता करता त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली आहे. आता त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आहे. या दुर्मिळ आजारात त्यांना कावीळ झाली असून ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांचं तात्काळ मोठं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आता त्यांना पुढच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.' यासाठी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये विलास उजवणे यांचे अकाऊंट डिटेल्स ही सोबत जोडले आहेत. या पोस्ट मध्ये विलास उजवणे यांच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती दिली आहे, सोबतच त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयीही त्यांनी बरच काही लिहिलं आहे. मध्यंतरी ते ब्रेन स्ट्रोक मधून बरे झाले होते पण परिस्थितीने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्यावर हृदयरोगाची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून बरे होत नाहीत तोवर एक दुर्मिळ कावीळ झाली. ज्याचे उपचार फक्त मुंबईत होतात. त्यामुळे त्यांना मदत करा असे त्यांच्या मित्राने म्हंटले आहे.

आपल्याला मदत करायची असल्यास..

Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 130200100009758. IFSC SRCB0000130

Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 005200100030302. IFSC SRCB0000005

हे त्यांचे अकाऊंट डिटेल्स आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT