actor Yogesh Shirsat and actress sharmishtha raut in shivsena eknath shinde  sakal
मनोरंजन

म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला.. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता योगेश शिरसाटसह 'हे' कलाकार शिंदे गटात..

कालाकारांमध्येही राजकीय प्रवेशाची चुरस..

नीलेश अडसूळ

Shivsena News: कलाकार आणि राजकारण यांचं एक वेगळंच नातं आहे. कलेला राजाश्रय हवा असतो त्यामुळे कलाकार राजकारणी माणसांशी निकटचे संबंध जोपासतात. शिवाय राजकीय नेत्यांनाही कलेची आवड असल्याने त्यांच्यात मैत्रीचे नाते पाहायला मिळते. तर कधी कलाकारांना राजकारणाची आवड असते. त्यामुळे अनेक कलाकार कलेसोबत राजकीय पक्षात प्रवेश करत असतात.

असाच राजकीय प्रवेश ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता योगेश शिरसाट याने शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटात केला आहे. योगेश सोबत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि अन्य काही कलाकारही आहेत.

(actor yogesh shirsat and actress sharmishtha raut in shivsena eknath shinde)

योगेश आणि शर्मिष्ठासोबत अभिनेता राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी योगेश शिरसाट याने शिंदे गटात प्रवेश करण्याचे कारणही सांगितले.

योगेश म्हणाला, 'आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, अनेक कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. या कलाकारांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. सिनेसृष्टीत धडपड करणाऱ्या कलाकारांचा आवाज आमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे,'असे त्याने सांगितले.

पुढे योगेश म्हणाला की, कलावंतांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्व कलाकार अभिनेता सुशांत शेलार यांच्या नेतृत्वात एकत्र आलो आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन विश्वात धडपड करणाऱ्या कलावंतांच्या राहण्याचा प्रश्न आहे, तसेच इतर काही प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. त्यावर काही उपाय काढण्याची विनंती आम्ही करणार आहोत.


योगेश ने आजवर अनेक विनोदी कार्यक्रमात काम केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून त्याला अधिक लोकप्रिय झाला. आजवर त्याने अनेक चित्रपट केले आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटात योगेशने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

Gokul Election 2026 : 'अदृश्य शक्ती कोण? नाव सांगा, मग बोलते'; शौमिका महाडिक यांचे 'गोकुळ'च्या रणधुमाळीत थेट आव्हान, भाजपच्या सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

Marathi News Live Updates : अमित शाह आज एएनटीएफ परिषदेचे उद्घाटन करणार

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT