फडणवीस, शिंदे शरद पवारांच्या भेटीला, दोघेही ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar Health Updates शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले आहेत.
Sharad Pawar Hospitalised

Sharad Pawar Hospitalised

Esakal

Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची आतापर्यंत भेट घेतलीय. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दौऱ्यानंतर थेट ब्रीच कँडी रुग्णालयात गेले आहेत.

Loading content, please wait...