Aishwarya Rai Net Worth Esakal
मनोरंजन

Aishwarya Rai Net Worth: परदेशातही आहे तिचं 'ऐश्वर्य', संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

ऐश्वर्या केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर ती एक बिझनेसवुमन देखील आहे. तिने अनेक स्टार्टअप्समध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहेत.

Vaishali Patil

Aishwarya Rai Net Worth: अभिनेत्री ऐश्वर्या राय आज चर्चेत आली आहे. यामागचं कारणं आहे ते ऐश्वर्यान थकवलेला टॅक्स. थकबाकीसंदर्भात तिला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. ऐश्वर्याला सिन्नर तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली आहे.

आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्याची एकूण संपत्ती किती कोटी रुपयांची आहे ते सांगणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने ही प्रॉपर्टी केवळ चित्रपटांद्वारेच नाही तर प्रॉपर्टी आणि इतर अनेक गुंतवणुकीद्वारे कमावली आहे.

ऐश्वर्या केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर ती एक बिझनेसवुमन देखील आहे. तिने अनेक स्टार्टअप्समध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहेत. ऐश्वर्या रायच्या चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर ती एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपयांच मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 775 कोटी रुपये आहे. यात तिच्या चित्रपटांच्या मानधनासोबतच एकूण संपत्तीमागे ब्रँड एंडोर्समेंटचाही मोठा वाटा आहे.

ऐश्वर्या राय लोरियल, लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, टायटन, लोधा ग्रुप, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची जाहिरात करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या फक्त ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 80-90 कोटी कमावते. याशिवाय ऐश्वर्या रायने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. अभिनेत्रीचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 21 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्याने दुबईतही प्रॉपर्टी घेतली आहे.

ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत 'जलसा'मध्ये राहते, ज्याची किंमत 112 कोटी रुपये आहे. याशिवाय ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांनी दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सॅंक्च्युरी फॉल्समध्ये पॅलेससारखा व्हिलाही खरेदी केला आहे. यासोबतच ऐश्वर्या रायचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 5,500 स्क्वेअर फूटमध्ये एक लक्झरी अपार्टमेंट आहे. 38000 प्रति चौरस फूट या दराने त्यांनी ते खरेदी केलं आहे. ज्याची आज एकूण किंमत २१ कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT