actress alia bhatt mehandi photo viral on social media fans said she got married to ranbir kapoor 
मनोरंजन

तर मग मेंहदीचा फोटो डिलीट का केला?, अलिया झाली ट्रोल

सकाळ ऑनलाईन

मुंबई - अलिया आणि रणबीरच्या रिलेशनशीपची चर्चा एव्हाना सगळीकडे झाली आहे. ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अलियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्या फोटोवरुन ती ट्रोलही झाली आहे. काही वेळाने तिनं तो फोटो काढून टाकल्यावर वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे.

मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेक सेलिब्रेटींनी लग्न केले. आदित्य नारायण, नेहा कक्कर, वरुण धवन, यासारख्या अनेकांनी कोरोनाच्या काळात लग्न उरकून घेतले. आता अलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात अलियाच्या हाताला मेहंदी असलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. अलियानं रणबीरशी गुपचूर लग्न केल्याची चर्चा या फोटोमुळे झाली आहे. त्यांनी कुणालाही न सांगता लग्न केले की काय असे बोलले जात आहे. मात्र ज्यावेळी खरे काय हे कळले तेव्हा चाहत्यांना धक्का बसला.

अलियानं हाताला मेहंदी लावल्याचा जो फोटो शेअर केला आहे त्यात तिनं लग्नाचे कपडे घातले आहे. त्यात ती सुंदर दिसते आहे. या फोटोवरुन चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. त्या फोटोमागील खरे कारण असे आहे की, अलियाच्या एका सेटवरील हा फोटो आहे. त्यावरुन अलियाला ट्रोल करण्यात आले आहे. एकानं म्हटले आहे की, अलिया तु नवरीच्या वेशात आम्हाला कधी दिसणार, तर आणखी एकानं रणबीरला अलियाचे झाले आता तुझे केव्हा, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

SCROLL FOR NEXT