Amala Paul gets engaged for second wedding: Esakal
मनोरंजन

Amala Paul Engaged: भोला फेम अमाला पॉलनं उरकला साखरपूडा! कोण आहे होणारा नवरा?

Amala Paul gets engaged for second wedding: अमालाने तिच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी तिच्या प्रियकराशी साखरपूडा केला आहे.

Vaishali Patil

Amala Paul gets engaged for second wedding: तमिळ चित्रपट अभिनेत्री अमाला  पॉल ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकताच अमालाने तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला. अमालाला तिच्या वाढदिवशी एक खास सप्राईज मिळाले आहे. अमाला पॉलला तिच्या प्रियकराने प्रपोज केले आहे.

काही काळापुर्वी अमालाने एएल विजय घटस्फोट घेतला होता. आता अमाला पुन्हा एंगेज झाली आहे. अमालाला तिचा मित्र जगत देसाई रोमँटिक अंदाजात प्रपोज केले. ज्याला अमालाने होकार दिला आहे.

अमला पॉल आणि जगत देसाई यांनी एका व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या व्हिडिओत त्यांनी रोमँटिक प्रपोजलची झलक दाखवली. आता दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अमाला पॉलचा बॉयफ्रेंड जगत देसाई याने त्याच्या इंस्टाग्रामवर हा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमालाने वाढदिवशी खूप धमाल केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अमाला पॉलला तिचा प्रियकर जगतने गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते.

हा रोमँटिक प्रपोजला होकार देत जगतला सर्वांसमोर लिप किस केले. जगतने अमाला पॉलसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत हे स्टार कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले.

हा व्हिडिओ शेअर करताना जगतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी जिप्सी राणी हो म्हणाली #Weddingbells #Happy Birthday my love.'

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तर अमालाच्या चाहत्यांना जगत कोण आहे हे जाणुन घ्यायचे आहे तर जगत देसाई हा गुजरातचा आहे. त्याला जिमचा शौक आहे. जगत हा श्वानप्रेमी देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगत देसाई हा गोव्यातील एका लक्झरी व्हिलाचा मॅनेजर आहे. दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. आता लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT