actress amruta subhash dream come true at filmfare awards 2024 SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2024: "कार्यक्रम गुजरातमध्ये होता म्हणून...", फिल्मफेअरनिमित्त अमृताचं स्वप्न झालं पूर्ण

फिल्मफेअरनिमित्त अमृता सुभाषचं स्वप्न पूर्ण झालं

Devendra Jadhav

Filmfare Awards 2024 News: फिल्मफेअर पुरस्कारांची रविवार रात्री घोषणा झाली. २७, २८ जानेवारीला गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शान वाढवली.

अशातच या सोहळ्यात बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष सुद्धा उपस्थित होती. फिल्मफेअरनिमित्ताने अमृताचं स्वप्न सत्यात उतरलं. अमृताने तिचा अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे.

(actress amruta subhash dream come true at filmfare awards 2024)

फिल्मफेअरमधील एक व्हिडीओ अमृताने शेअर केलाय. यावेळी सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार शबाना आझमींना मिळाला. विशेष म्हणजे अमृताच्या हस्ते शबानाजींना हा पुरस्कार मिळाला.

यावेळी अमृता म्हणाली, "लहान असताना जेव्हा शबानजींची अनेक कामं डोळ्यात प्राण आणून पाहिली. ज्याचं मंडी मधलं पात्र पाहून, त्यात त्यांनी घेतलेला बोलण्याचा लहेजा, त्या भूमिकेसाठी त्यांनी वाढवलेलं वजन, बदललेली देहबोली हे पाहून मी थक्क झाले होते. त्यांना पुरस्कार देण्याची मोलाची संधी फिल्मफेअरनं मला दिली याबद्दल मी कृतज्ञ आहे."

अमृता पुढे म्हणाली, "जी स्वप्नं आपण पाहतो ती सत्यात उतरली की कोण आनंद होतो. पण ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती ते जेव्हा असं सत्यात उतरतं तेव्हा शब्द मुके होऊन जातात. त्या शब्दातीत अनुभवाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न मी त्या प्रसंगी जे बोलले त्यात केला. ह्या प्रसंगी मी नेसलेली ही साडी माझी मैत्रीण आणि एक सच्ची कलाकार अश्विनी गिरीनं मला भेट दिली आहे. अश्विनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात ली माझी सिनिअर. तिनं माझ्या कामाचं कौतुक म्हणून दिलेली ही साडी या सुंदर प्रसंगी नेसता आली याचा आनंद वेगळाच! कार्यक्रम गुजरातमध्ये होता म्हणून खास गुजराती स्टाइल मध्ये.."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT