actress archana nevrekar revealed truth about Bollywood film industry nsa95 sakal
मनोरंजन

..तर तुम्हाला चार लोकांसोबत.. 'या' अभिनेत्रीने सांगितला अत्यंत कटू अनुभव

अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी सांगितला मनोरंजन विश्वातील कटू अनुभव..

नीलेश अडसूळ

archana nevrekar : अर्चना नेवरेकर हे नाव आजच्या पिढीला ठाऊक नसले तरी अर्चना यांनी एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. अनेक सुपरहीट चित्रपट त्यांनी केले आहे. अत्यंत हालखीच्या परिस्थितीतून अर्चना त्यांनी मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. 'वासूची सासू' हे अर्चना यांनी साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. 'ती फुलराणी', 'जन्मदाता', 'स्वप्न सौभाग्याचे', 'सुना येती घरा', 'वहिनीची माया' अशा विविध नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अर्चना नेवरेकर या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मोठ्या भगिनी. आज अर्चना यांच्यामुळेच सुप्रिया अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. अर्चना यांनी एका मुलाखतीत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

अर्चना यांनी एका मुलाखतीत हिंदी चित्रपटसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, 'एकदा एका हिंदी चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. तो चित्रपट खूप मोठा होता. मी त्याचे नाव सांगणार नाही. कारण नंतर त्याचे परिणाम वाईट होतील. त्या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड करण्यात आली होती. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. तुमचं सगळं ओके आहे, आम्ही तुमचे मालिकेतील काम पण बघितलं आहे. तुमचे फोटो पण चांगले आहेत. तुम्ही हा चित्रपट करताय,असं मला सांगण्यात आलं. पण नंतर एक अट घालण्यात आली. या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार लोकांसोबत राहावं लागेल.’ अशी अट त्यांनी घातली होती. त्यावेळी मी ही अट नाकारली. माझ्यासोबत जी दुसरी मुलगी निवड झाली होती, तिने ती मान्य केली आणि ती आजच्या घडीला मोठी सुपरस्टार आहे.' असे मनोरंजन विश्वाचे काळे वास्तव अर्चना यांनी मांडले. (actress archana nevrekar revealed truth about of Bollywood film industry)

अर्चना यांना चार बहिणी आहेत. त्या अगदी लहान असतानाच त्यांचे वडील गेले. पुढे कुटुंबाची जबाबदारी अर्चना यांच्यावर येऊन पडली. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्या शाळेत शिकत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांच्या नाटकात बालकलाकार म्हणून कामही केले. पुढे मालिका आणि सिनेविश्वात छोटी मोठी पात्र साकारत त्या प्रमुख भूमिकेपर्यंत पोहोचल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT