actress ashvini mahangade revealed about her life partner love relationship with nilesh jagadale sharing video sakal
मनोरंजन

Ashvini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेनं निवडला जन्माचा साथीदार.. व्हिडिओ शेयर करत दिली गुड न्यूज

अश्विनी म्हणाली, अनेक संकटांमधून गेल्यावर..

नीलेश अडसूळ

Ashvini Mahangade: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्ट्स मधून चर्चेत असते. अनघा अभिनय क्षेत्रात यशस्वी आहेच शिवाय ती सामाजिक भान सुद्धा जपणारी आहे.

अश्विनी तिच्या रयतेचं स्वराज्य संस्थान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. शिवाय स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे ती ''शिवकन्या राणू अक्का'' म्हणूनही प्रसिद्ध आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यातही महाराजांच्या विचारांवर चालते, याबाबत ती अनेकदा बोलत असते.

नुकतीच ती 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात झळकली. यातील तिच्या 'माई' या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. पण आज अश्विनीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. अश्विनीने आपल्या साथीदाराचे नाव जाहीर केले आहे. एक व्हिडिओ शेयर करत तिने ही माहिती दिली.

(actress ashvini mahangade revealed about her life partner love relationship with nilesh jagadale sharing video)

अश्विनीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये तिचा होणारा पती आणि एकत्र आहेत. दोघांचेही काही फोटो एकत्र केलेला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला तिनं एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ''आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…''असं ती म्हणाली आहे.

तिचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. तर तिच्या जोडीदाराचे नाव नीलेश जगदाळे असे आहे. नीलेश हा शेतकरी कुटुंबातला मुलगा असून सध्या तो शेती सोबतच फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेश या कंपनीचा मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. तर 'रयतेचे स्वराज्य' या अश्विनीच्या प्रतिष्ठानमध्ये तो पूर्णवेळ सक्रिय असतो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. लवकरच ते लग्नगाठ देखील बांधणार आहे. यापूर्वी देखील अश्विनीने अनेकदा त्याच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. ते अनेकदा सर्व कार्यक्रमांना एकत्र असतात. पण आजवर ती या नात्याबाबत कधी बोलली नव्हती. पण आज तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केली. त्यामुळे आता सर्वत्र अश्विनीचे कौतुक सुरू असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT