athiya shetty and kl rahul Sakal
मनोरंजन

Athiya Shetty: पती केएल राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टी झाली भलतीच रोमँटिक, फोटो पोस्ट करत म्हणाली...

अथिया शेट्टीने पती केएल राहुलला वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Aishwarya Musale

क्रिकेटर केएल राहुल आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहत्यांनी, कुटुंबीयांनी आणि जवळच्या लोकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री अथिया शेट्टीने पती केएल राहुलला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर काही न पाहिलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोंची झलक दाखवली आहे, ज्यामध्ये ती पती केएल राहुलसोबत दिसत आहे. अथियाने केएल राहुलला मिठी मारली आहे.

अथिया आणि केएल राहुल एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. अथियाने या फोटोजला एक गोंडस कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, 'हॅप्पी बर्थडे टु माय बिगेस्ट ब्लेसिंग.'

दुसरीकडे, अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही जावई केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सुनील जावई केएल राहुलच्या कपाळावर टिका लावताना दिसत आहे.

हा फोटो केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा आहे. सुनील शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलने या वर्षी जानेवारीमध्ये लग्न केले होते. याआधी दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केले होते. सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम पार पडले. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

FDA चा छापा; ५५ हजाराचा गुटखा जप्त, पण मकोकाअंतर्गत गुन्हा नाही, तुकाराम मुंढेंचे आदेश असतानाही टाळाटाळ?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत दमदार पावसाची हजेरी

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT