avika and manish  Team esakal
मनोरंजन

'माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते, तुम्ही अफेअरच्या गोष्टी करता'

लोकांना आपण अनेकदा काय बोलत आहोत हे कळत नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - बालिका वधू (balika vadhu) मधील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर (avika gaur) आणि तिचा सहकारी अभिनेता मनीष रायसिंघन (manish raisinghan) यांच्यातील नात्याविषयी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता अभिनेत्री अविकानेच त्यावर ट्रोलर्सच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची कीव केली आहे. लोकांना आपण अनेकदा काय बोलत आहोत हे कळत नाही. त्याचा दुस-यांना किती त्रास होतो याचेही त्यांना काही वाटत नाही. याचे मला आश्चर्य वाटते. (actress avika gaur affair with the costar manish raisinghan and secret having child)

अविकानं (avika) सोशल मीडियावर (social media) आपल्याविषयी जी चर्चा आहे त्याविषयी सांगितलं आहे, आमच्या दोघांमध्ये काही काळ आकर्षण होतं. मात्र ते दूर ठेवण्यासाठी आम्ही लांब राहणे पसंत केलं. दोन आठवडे झाले आम्ही एकमेकांशी बोललोही नाही. अविका आणि मनीष रायसिंघननं ससुराल सिमर का या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. या मालिकेत एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यांच्या अफेयचीही चर्चा व्हायला लागली. एवढेच नाही तर त्यांना एक अपत्यही झालं आहे. आणि त्यांनी ते लपून ठेवलं आहे. अशा प्रकारची चर्चा करण्यापर्यत ट्रोलर्सनं पातळी ओलांडली होती.

आरजे सिद्धार्थनं याविषयी अविकाला एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी अविकानं सांगितलं, हे असं होणं अशक्य आहे. अजिबातच नाही. आम्ही मुलाला लपवले. अशाप्रकारचे आर्टिकल प्रसिध्द झाले. हे पूर्णपणे चूकीचे आहे. आम्ही जवळ होतो. आणि आहोतही. त्यांचे माझ्या आयुष्यातले योगदान मोठे आहे. ते माझे सर्वात जवळचे मित्रही आहेत.

वयाच्या 13 व्या वर्षांपासून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. ते माझे सर्वात जवळचे मित्रही आहेत. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. ते माझ्याहून 18 वर्षांनी मोठे आहेत. जेव्हा मला कळलं की त्यांच्या आत एक लहान मूलही दडले आहे. तर ती मोठी गोष्ट आहे. जेव्हा लोक मला विचारतात की त्यांचे आणि तुमचे काही आहे का, त्यावर मला त्यांना एकच सांगावेसे वाटते, माझ्या वडिलांपेक्षा थोडा लहान आहे तो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

अदाणी समूह RCB चा संघ खरेदी करणार? 'या' चार कंपन्याही आहेत शर्यतीत...

Latest Marathi News Live Update : पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

'अल्पवयीन विवाहित मुलीशी लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच!' High Court चा ऐतिहासिक निर्णय, मुस्लिम वैयक्तिक कायदा फेटाळला

हृतिक रोशनच्या एक्स पत्नी सुझानला मातृशोक ! वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT