this actress of Bollywood is Asias most sexy women  
मनोरंजन

दीपिका, कतरिना नाही तर 'ही' आहे आशियातली सर्वात सेक्सी महिला !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्री कोण हे ठरवणं कठीणच आहे. अभिनेत्रींची फॅन फोलोइंगही तेवढीच जास्त आहे. एवढचं काय बॉलिवूडच्या कलाकारांची पसंती जगभरातून आहे. काही दिवसांपूर्वीच आशियातल्या सर्वात सेक्सी पुरुष म्हणून बॉलिवूडचा अभिनेता आणि डान्स मास्टर हृतिक रोशनची निवड झाली. आता आशियातल्या सर्वात सेक्सी महिलेची निवडदेखील झाली आहे, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री ! 

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने आशियातील सर्वात सेक्सी दिसणाऱ्या पुरुषांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये हृतिक रोशनला 2019 चा आशियातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणून घोषित करण्यात आले. त्याचमागोमाग आता आशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट हीची निवड करण्यात आली आहे. तर, दीपिका पदुकोन ही संपूर्ण दशकातील सर्वात सेक्सी महिला ठरली आहे. लंडनमध्ये एका ऑनलाइन स्पर्धेमध्ये या दोघींना हा मान मिळाला आहे. 

'स्टुडंट ऑफ दी इयर' ने आलियाने 2012 ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर उडटा पंजाब,  हायवे, 2 स्टेट्स, डिअर जिंदगी, कलंक, राझी असे सुपरहिट सिनेमे तिने केले. या सर्व चित्रपटातूंन तिने वेगवेगळे रोल साकारले आणि बी-टाउनमध्ये आपली जागा निर्माण केली. या वर्षी आलियाने रणवीर सिंगसोबत 'गल्ली बॉय' हा सुपरहिट सिनेमा केला. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. 

‘इस्टर्न आयचे एन्टरटेन्मेंट संपादक आणि यादीचे संस्थापक म्हणाले, 'आलिया भट्टसारखं फेमस व्यक्तीमत्त्व सध्या कुठेच नाही. हिंदी चित्रपटांमध्येही ती पुढील दशकात बॉलिवूडमध्ये राणीसारखं अधिराज्य गाजवेल'.

-मागिल वर्षी हा मान दीपिकाने पटकावला होता आता मात्र यावर्षी ती दुसऱ्या स्थानावर आहे. आलिया भट सध्या अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूरसोबत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी मे महिन्यात 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Panchang 22 December 2025: आजच्या दिवशी शिवकवच स्तोत्राचे पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक, बंगळूरस्थित कंपनीकडून घेतली लाच

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT