मुंबई : शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' ला विरोध करण्यात आला पण तरीही बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच धुमाकुळ घातला. बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला आणि कियारा अडवाणीला या चित्रपटाने आणखी एक्सपोझर मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री कियाराने आजवर मोजकेच हिंदी सिनेमे केले आहेत पण सर्व भूमिकांतून तिने वेगळेपण दाखविले. सध्या ती टॉपला आली आहे. पण, कियाराला भाईजानने म्हणजेच सलमानने नाव बदलण्यासाठी सांगितले होते. जाणून घ्या काय आहे कारण
कायराने फगली, एम.एस. धोनी, लल्ट स्टोरीज, कलंक, कबीर सिंग असे हिंदी चित्रपट केले आहेत. 'लल्ट स्टोरीज' या चित्रपटातून तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं आणि अभिनयाची दाद देण्यात आली. एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार कियाराने किस्सा सांगितला. सलमानने कियाराला तिचं नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. बॉलिवूड इन्डस्ट्रीमध्ये आलिया भट्ट आहे. त्यामुळे आलिया नावाच्या दोन अभिनेत्री असल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो.
सलमानचा सल्ला कियाराने ऐकला. त्य़ानुसार आलिया वरुन तिने कियारा असं नाव बदललं. कियाराचं आत्ताचं नाव 'कियारा आलिया आडवाणी' असं आहे. पासपोर्ट आणि आधारकार्डवर आलिया आडवाणी असचं नाव आहे. 'सरकारी कागदपत्रांवर मी अद्याप नाव बदलले नसल्यामुळे परदेशात गेल्यावर नावामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं. याच सर्व अडचणींमुळे लवकरच आधारकार्ड आणि पासपोर्ट वरचं नावही मी बदलणार आहे.' अशी माहिती स्टपॉटबॉयला कियाराने दिली.
कियारा 'गूड न्युज' या चित्रपटातून दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 27 डिसेंबरला रिलिज होणार आहे. यामध्ये करीना कपूर खान, अक्षय कुमार, दिलजित दोसांज हे मंडळी असणार आहेत. कियारा लक्ष्मी बॉंब आणि भूल भुलैय्या 2 मध्ये पुढच्या वर्षी दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.