actress Chhavi Mittal terrible accident on set, hair caught on fire read more SAKAL
मनोरंजन

Chhavi Mittal: प्रसिद्ध अभिनेत्रीचा भयंकर अपघात, केसांना आग लागून घडलं असं काही की... वाचा सविस्तर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलसोबत भयंकर प्रकार घडल्याचं उघड झालंय

Devendra Jadhav

Chhavi Mittal News: नुकतीच टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलसोबत सेटवर एक भयानक घटना घडल्याची बातमी आहे.

तिच्या केसांना आग लागली आहे. ज्याचा लाईव्ह व्हिडिओ तिने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून काळजी वाटलीय.

(actress Chhavi Mittal terrible accident on set, hair caught on fire)

छवीच्या केसांना लागली आग, काय घडलं नेमकं?

छवी मित्तल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण नुकतेच छवीने असे काही पोस्ट केले की सर्वांनाच धक्का बसला.

छवीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोणाशी तरी बोलत असून अचानक तिच्या केसांना आग लागल्याचे दिसते.

मात्र त्याक्षणी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने ती आग वेळीच विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. "माझे तिचे केस जळाले का", अशी प्रतिक्रिया छवीने दिली. काही सेकंद काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

अपघात झाल्यावर छवीची प्रतिक्रीया

हा व्हिडीओ शेअर करताना छवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सेटवर अपघात होतच राहतात, पण मला माझ्या केसांना अचानक लागलेली आग सर्वात भयानक वाटली. ही घटना चुकून कॅमेऱ्यात कैद झाली. करण वीर ग्रोव्हरचेही आभार कारण त्याने आपल्या हातांनी आग विझवून मला वाचवले."

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीनेही 'अरे देवा' अशी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT