Pearl puri and divya khosla kumar  Team esakal
मनोरंजन

दिव्यानंही घेतली पर्ल वी पुरीची बाजू, सोशल मीडियावर चर्चा

तिनं एका पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता पर्ल वी पुरीच्या (pearl v puri) समर्थनार्थ आता एकापाठोपाठ बॉलीवूड सेलिब्रेटींची (bollywood celebrities) संख्या वाढताना दिसत आहे. यापूर्वी टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांनी पर्लला पाठींबा दिला होता. त्यानंतर त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. आता बॉलीवूडची अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारनं देखील पर्लची बाजू घेतल्याचे दिसून आले आहे. तिनं एका पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Actress Divya Khosla Kumar supports Pearl V Puri in rape case)

दिव्यानं सोशल मीडियावर (social media) एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिनं पर्लला कुणी फसवलं आहे त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ती देखील चर्चेत आली आहे. पर्ल वी पुरी हा आता एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या आरोपामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्यावर टीकाही होत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रेटींनी त्याला आपला सपोर्टही दिला आहे. दिव्यानं जी पोस्ट केली आहे त्यात तिनं पर्लला कशाप्रकारे अडकवण्यात आले त्याचा घटनाक्रम दिला आहे.

दिव्याच्या इंस्टा पोस्टमध्ये तिनं काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर तिनं एक मोठी पोस्टही लिहिली आहे. त्यात ती म्हणते, सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तींचा परिचय मी आपल्याला करुन देते. या फोटोमधील व्यक्तिनं पर्ल वी पुरीवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यांनी ही तक्रार दाखल केली आहे त्यांनी व्देषाच्या भावनेतून हा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी दिव्यानं त्या फोटोंमधील व्यक्तींच्या खासगी आयुष्यातील काही घटनांचाही उल्लेख केला आहे.

पर्लला आता पोलिसांनी अटक केली आहे. 2019 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाच त्याला अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न दिव्यानं उपस्थित केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा पर्लचे नाव त्या एफआयआरमध्ये नव्हते. त्यानंतर ते अचानक आले. आपणही ती एफआयआर वाचल्याचे दिव्यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT