मनोरंजन

'माझा होशील ना' मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; गौतमीची भावनिक पोस्ट

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील 'माझा होशील ना' या प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेतील आदित्य आणि सई यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत आदित्य ही भूमिका अभिनेता विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) साकारली असून सई ही भूमिका अभिनेत्री गौतमी देशपांडेने (Gautami Deshpande) साकारली. या मालिकेने प्रेक्षकांची निरोप घेतला आहे. नुकतीच गौतमीने मालिकेबद्दलची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

गौतमीची भावनिक पोस्ट

गौतमी देशपांडेने सोशल मीडियावर सहकलाकरांसोबतचे फोटो शेअर करून मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. गौतमीने कॅप्शन मध्ये लिहीले, 'माझी reel पण तरीही real बनलेली फॅमिली. आपली मज्जा, एकत्र जेवण, सीनचा वेळेचा टाईमपास सगळं सगळं लाइफ टाईम लक्षात राहील.मुलींचा मेकअप रूम मधली गाणी, गप्पा गोष्टी, चिडचिड, रडणं, हसणं, एकमेकांना समजावणं , रील्स बनवणं.सगळं सगळं आयुष्यभरसोबत देईल.आमचा सर्व रसिक प्रेक्षकांना आणि फॅन्स आणि फॅन क्लब यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रेमामुळे 'माझा होशील ना' मालिका घडली. आज निरोप घेतोय.पण तो फक्त TV वरून.तुमचा मनात 'माझा होशील ना' ही मालिका कायमचं घर बनवणार आहे.असंच प्रेम करत राहा. इतके दिवस ही सई तुमची झाली होती. पण आज नंतरही तुम्ही तिचे राहाल ना ?' गौतमीच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

'माझा होशील ना' या मालिकेमध्ये गौतमी आणि विरोजससोबतच विनय येडेकर, अक्षय कुलकर्णी, सुलेखा तळवलकर,विद्याधर जोशी, निखिल रत्नपारखी या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT