actress gehan vasistha  Team esakal
मनोरंजन

अभिनेत्री गहनाला पाच महिन्यानंतर दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

तिला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - गंदी बात फेम (gandi baat) अभिनेत्री गहना वसिष्ठला (gehana vasistha) कोर्टानं दिलासा दिला आहे. गहनाला पाच महिन्यांनी जामीन मिळाला आहे. पॉर्न व्हिडिओ शुट करणं आणि अपलोड करणं याप्रकरणी तिला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला पाच महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. मुंबईतील गोरेगावच्या सेशन्स कोर्टानं गहनाला पॉर्नोग्राफी (pornography) संबंधित प्रकरणात आता दिलासा दिला आहे. गहनाच्या एका प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे. (actress gehana vasisth gets bail after five months arrested for shooting uploading porn videos)

त्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांच्या अंतरानं गहनाला जामीन मिळाला आहे. राज्यात असणा-या लॉकडाऊनच्या कारणामुळे कोर्ट बंद होते. त्यामुळे तिला जामीन मिळण्यास उशिर झाला. मे ते जून च्या पहिल्या आठवडयांपर्यत कोर्टाला सुट्टी होती. त्यामुळे तिला जामीनासाठी वाट पाहावी लागली होती. अखेर तिला देश सोडून कुठेही बाहेर जायचे नाही, अशा अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गहनानं 85 पेक्षा जास्त अॅडल्ट व्हिडिओ (adult video) तयार केले असून ते एका वेबसाईटवर शेअर केले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार गहनाचे स्वताचे एक प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यात तिनं एका वेबसिरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ तयार केले होते. मात्र गहनानं आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

पोलिसांनी केलेल्या तपासातून काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्यात गहना जे नवोदित कलाकार आहेत त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पॉर्न फिल्म शुट करुन घेत होती. ती संबंधित एका कलाकाराला एका शुटचे वीस हजार रुपये देत होती. गहना ही अल्ट बालाजीवर आलेल्या गंदी बात या सिरिजमुळे प्रसिध्द झाली होती. याशिवाय तिनं काही साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT