मनोरंजन

'वय झालंय माझं': हेमांगीची नवी पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असेत.

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असेत. तिच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी हेमांगी 41 वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने खास पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

हेमांगीने काळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट अशा लूकमधील फोटो शेअर केला. या फोटोला हेमांगीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. तिने कॅप्शनमध्ये लिहीले होते, 'मी 41 वर्षांची झाले. गूगल वर जन्मतारीख बरोबर आहे पण सालाची (Birth Year) नोंद चुकीची आहे याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी! धन्यवाद! 1 ते 20 वर्षाचे सर्व लोक मला काकू म्हणून शकतात. कारण काकू म्हणल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय!' हेमांगीच्या या पोस्टवर ईशा केसकर, ऋतुजा बागवे आणि सोनाली कुलकर्णी या अभिनेंत्रींने कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेमांगीची अंतर्वस्त्रांबाबतची पोस्ट

काही दिवसांपूर्वी हेमांगीने अंतर्वस्त्रांबाबत पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामध्ये तिने लिहीले, 'लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. त्यावरून जज करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा किंवा गॉसिप करण्याचासुद्धा ज्याचा त्याचा चॉईस. अंतर्वस्त्रांचा लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो, त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचा आहे हे लक्षात येतं. गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात'.

हेमांगीने 'तेरी लाडली मै' या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. हेमांगीने मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT