Actress Janhvi Kapoor Dancing On Rekha's In Ankho Ki Masti esakal
मनोरंजन

जान्हवीच्या अदा अन लाखो फिदा! रेखाच्या 'ईन आखो की मस्ती'वर नाचतेय जान्हवी

तीने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केलाय.ज्याची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

जान्हवी अभिनय करताना चाहत्यांनी बघितलेच आहे.पण जान्हवी उत्तम डान्स करते हे आज सोशल मीडियावरील प्रतिक्रिया बघाल तर तुमच्याही लक्षात येइलच.जान्हवी तीच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच अॅक्टीव असणारी अभिनेत्री आहे.तीच्या लेटेस्ट फोटोशूटचे,शूटिंग सेटवरचे फोटोज ती इन्स्टाग्रामर टाकत असते.अलीकडेच तीने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केलाय.ज्याची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओ मधे जान्हवी खाली बसून रेखाच्या अंदाजात 'इन आखो की मस्ती' या गाण्यावर डान्स करतेय. तीच्या या डान्सला सोशल मीडियावर चाहत्यांच्या भरगोस प्रतिक्रिया मिळत आहेत. अवघ्या काही तासात जान्हवीच्या या डान्सला १४ लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक बॉलीवूड कलाकारांनी तीच्या या डान्सचे कौतुक केले आहे.दोन वर्षा आधीच्या या डान्सचा व्हिडिओ जान्हवीने आज इन्स्टाग्रामवर पोस्ट करत 'इंटरनॅशनल डान्स डे' च्या निमित्ताने दोन दिवस उशिरा हा व्हिडिओ पोस्ट करतेय,असे तीने पोस्टच्या कॅप्शनमधे लिहिले आहे.'

मनीष मल्होत्रा,शनाया कपूर,सान्या मल्होत्रा यांनी जान्हवीच्या डान्सचे कौतुक करत इन्स्टाग्रामवर कमेंट्स केले आहेत.'मीस्टर अँड मिसेस माही','बाँबे गर्ल' हे जान्हवीचे भविष्यात येणाऱ्या काही चित्रपट असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT