actress janhvi kapoor replied to social media user on Instagram who asked can we kiss 
मनोरंजन

चावट नायतर, किस करायचं म्हणत होता; जान्हवीनं असं काय सुनावलं... 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपला आव़डता, आवडती सेलिब्रेटी म्हटली की त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर प्रेम करु लागतात. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. अनेकांच्या वाट्याला प्रचंड लोकप्रियता वाट्याला येते. कित्येकांना ती मिळवण्यासाठी प्रय़त्न करावे लागत असल्याचे दिसून आले आहे. सध्या जान्हवी कपूर एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. त्याचे कारण ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. असे काय झाले की जान्हवीला राग अनावर झाला आणि तिनं त्या चाहत्याला खडे बोल सुनावले. रुही या जान्हवीच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद चाहत्यांचा मिळाला होता. त्यामुळे जान्हवी भलत्याच आनंदात आहे. सोशल मीडियावर तिचे कौतूक होताना दिसत आहे. दुसरीकडे काही युझर्सनं तिला वेड्यासारखे प्रश्न विचारुन हैराण केले आहे. 

त्याचं झालं असं की जान्हवी कपूरनं इंस्टावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यावरुन मोठ्या प्रमाणात तिचं कौतूकही होत आहे. दुसरीकडे तिला ट्रोलही केले जात आहे. ज्यावेळी इंस्टाग्रामवर तिनं ते फोटो पोस्ट केले तेव्हा एका फॅन्सनं तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्यानं तिला चक्क किस करण्याची इच्छा असल्याचेही सांगितले. यासगळ्या प्रकाराचा जान्हवीला मोठा धक्काच बसला. त्यामुळे तिला काय करावे कळेना.

या सगळ्या प्रकरणावर जान्हवीनं सरळ उत्तर देऊन त्या युझर्सला चांगलेच सुनावले आहे. तिनं सरळ नाही म्हणून सांगितलं. दिवसेंदिवस जान्हवीचा अंदाज लोकांना कमालीचा आवडताना दिसत आहे. त्यामुळे ते तिच्या फोटोंवर फिदा होताना दिसत आहे. यामुळे की काय एका फॅन्सनं तिला किस करण्याची इच्छा व्य़क्त केली होती. बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्री तिच्या या वेगळ्या आणि हटके लूकचे कौतूक करताना दिसत आहेत.

सध्या जान्हवीचं फिल्मी करिअर हे उत्तमरीतीनं सुरु आहे असे म्हणायला हरकत नाही. इशान खट्टर बरोबर तिनं धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिचं करिअर सुरु झालं. गेल्या वर्षी तिचा गुंजन सक्सेना नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा रुही नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्या चित्रपटात जान्हवी बरोबर राजकुमार राव, वरुण शर्मा सारखे अभिनेते आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT