actress Kananga ranaut case Mumbai magistrate issued bailable warrant against actress 
मनोरंजन

'माझ्याशी पंगा घेते काय, तुला दाखवतोच इंगा' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री कंगणाच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी वाचाळ कंगणाला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे असे दिसते आहे. या दोघांमधील वाद आता न्यायालयाच्या दारात गेला असून त्यावरुन सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी कंगणा आणि जावेद अख्तर यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन दोघांच्या चाहत्यांमध्येही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले होते.

जावेद अख्तर यांनी कंगणाच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर आता मुंबई न्यायालयानं कंगणाच्या विरोधात वॉरंट जाहिर केला आहे. कंगणानं आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप जावेद यांनी केला आहे. अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टांनं सांगितले की, यापूर्वी अभिनेत्री कंगणाला कोर्टात राहण्याचे आदेश दिले असतानाही ती उपस्थित राहिली नाही. त्यानंतर कोर्टानं तिच्याविरोधात वॉरंट काढले आहे. 1 फेब्रुवारीला कंगणाला समन्स जाहीर करण्यात आले होते. त्यात तिला 1 मार्च रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते.

सोमवारी कंगणा कोर्टात आली नाही. त्यामुळे कोर्टानं तिच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. कंगणाच्या वकिलानं सांगितले की, त्या समन्सच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यावर पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. त्याचे झाले असे की, जावेद यांनी कंगणावर आरोप केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे, कंगणानं आपल्याविरोधात चूकीचे विधान केले होते. कंगणानं माझ्याविरोधात माध्यमांमध्ये चूकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे न्यायालयात गेलो आहे. कंगणावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे.

कंगणा म्हणाली होती, सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला बॉलीवूडमधील गटबाजी कारणीभूत आहे. ऋतिक रोशनच्या विरोधात आपण केलेली केस मागे घेण्याची धमकी जावेद अख्तर यांनी दिली होती. असे कंगणाने सांगितले. कंगणाच्या अशाप्रकारच्या वक्तव्यावर जावेद यांनी कंगणाला कोर्टात आव्हान दिले आहे. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT