actress Kananga ranaut will play role of Indira Gandhi share looks in Indira getup
actress Kananga ranaut will play role of Indira Gandhi share looks in Indira getup 
मनोरंजन

ऐकलं का, इंदिरा गांधींच्या भूमिकेत चक्क कंगणा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई-  अभिनेत्री म्हणून कंगणा राणावतला सगळेच ओळखतात. पण कोणत्याही घडामोंडीवर तातडीनं मत व्यक्त करण्याचं चातूर्य तिच्याकडे आहे. सोशल मीडियावर तिच्या या कलेनं सर्वांची झोप उडवली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कंगणाचा राग आहे. कंगणाची आणि त्यांची कडाक्याची भांडणे आहेत. कुणीही माघार घ्यायला तयार नाही. कंगणाला प्रत्येक बाबतीत मत नोंदवायचे असल्यानं ती सोशल मीडियाचा हवा तसा वापर करते. कॉग्रेसच्या विरोधात पोस्ट करुन आपण विश्लेषकाच्या भूमिकेत आहोत असे दाखविणा-या कंगणाचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात कंगणानं साकारलेली भूमिका ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

आतापर्यत कंगणाने महिलांवर आधारित अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. आता कंगणा देशाच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्र चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. याची माहिती कंगणानं व्टिट करुन दिली आहे. कंगणानं सांगितले की, इंदिराजी माझ्यासाठी एक आयकॉनिक महिला आहेत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी मी फोटोशुट केले आहे. मी ज्यावेळी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती तेव्हा मला वाटले नव्हते की मी कधी इंदिरा गांधीची भूमिका करेल. अशा आशयाचे व्टिट कंगणानं शेयर केले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर तयार होणा-या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झाले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आणखी एका व्टिटमध्ये कंगणानं सांगितले की, मला हे सांगताना आनंद होतो आहे की, माझे मित्र साई कबीर हे एका पॉलिटिकल ड्रामावर काम करत आहे. त्याचे दिग्दर्शन मणिकर्णिका प्रॉडक्शनच्यावतीने केले जाणार आहे. मात्र साई कबीर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आपण करणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. त्यावेळच्या देशाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा वेध चित्रपटाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

एका पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. कंगणानं त्या पुस्तकाचे नाव सांगितले नाही. चित्रपटात वेगवेगळे कलाकार काम करणार आहेत. भारतातल्या सर्वात लोकप्रिय असणा-या व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली याचा आनंद होतो आहे. भारतीय राजकारणात इंदिरा यांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले आहे. असेही कंगणानं यावेळी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT