actress kangana ranaut brutally trolled for supporting queen Elizabeth disrespecting mahatma Gandhi  
मनोरंजन

गांधी महान नेते होते, पण महान पती नाही; का म्हणाली कंगणा असं?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वादाची सवय झालेल्या कंगणाला आपल्याला कोण काय म्हणतयं, कोण नावं ठेवतयं, टीका करतयं याची काही पर्वा नाही. तिला याचा काही फरक पडत नाही. शेवटी आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे असा सूर कंगणा आळवत असते. आता तर तिनं जे विधान केलं आहे त्यावरुन ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. तिनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे ब्रिटनच्या राणीचं कौतूक केलं आहे. यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. तिच्यावर टीका झाली आहे. अनेकांनी मीम्स तिला पाठवले आहेत. सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

त्याचं झालं असं की कंगणानं मेगन मार्केलच्या मुलाखतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. मेगनच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना कंगणानं राणी एलिझाबेथ दुसरीला पाठींबा दर्शवला आहे. कंगणा आता ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यावेळी तिला ज्यांनी ट्रोल केले त्यापैकी एकाला कंगणानं महात्मा गांधी यांचा संदर्भ दिला आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, गांधीजी हे वाईट व़डिल होते. त्यांनी देखील आपल्या पत्नीला कित्येक वेळा घराच्या बाहेर काढले होते. मात्र जग त्यांना काहीही म्हणणार नाही. कारण ते पुरुष होते.

शुक्रवारी दुपारी कंगणानं अशाप्रकारचे व्टिट करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. कंगणानं लिहिलं आहे की, काही दिवसांपासून एका परिवारावर लोकं खुप काही बोलत आहेत. त्यांच्याविषयी चर्चा सुरु आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून लोकं सांगत आहेत. मी काही ती मुलाखत पाहिलेली नाही. कारण सासु सुनेतील भांडण आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी मला फारशा आवडत नाहीत. कंगणानं आपल्या व्टिटमध्ये असे लिहिले आहे की, मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, आता पूर्ण जगात आता केवळ एकच महिला शासक राहिली आहे. 

आपण असे म्हणू शकतो की ती एक आदर्श पत्नी, मुलगी, बहिण होऊ शकत नाही. तिनं आपल्या वडिलांच्या स्वप्नाला पुढे नेलं. ती एक महान राणी आहे. कुठल्याही राजकुमारापेक्षाही तिनं मोठी झेप घेतली आहे. आपण आयुष्यभर एकच भूमिका घेऊन जगु शकत नाही. प्रवाहाबरोबर आपल्याला चालावे लागते. गांधींजीविषयी कंगणा म्हणाली, त्यांच्या मुलांनी ते चांगले वडिल नसल्याचे सांगितले होते. अनेक ठिकाणी असे उल्लेख आहेत की, गांधींच्या पत्नीनं शौचालय साफ करण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढले होते. ते एक महान नेता होते. पण महान पती नव्हते. मात्र तरीही त्यांना जग माफ करेल याचे कारण ते पुरुष होते. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT