Actress Kangana Ranaut Team esakal
मनोरंजन

कंगणा राजकारणात प्रवेश करणार ? भाजपच्या नेत्याचे संकेत

पंजाब विधानसभा (Punjab) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील लोकसभेच्या पोटनिवडणूका होणार आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असणारी अभिनेत्री म्हणून कंगणा (actress kangana ranaut ) प्रख्यात आहे. तिच्या आतापर्यतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिचे व्टिटरचे अकाऊंटही बंद करण्यात आले आहे. मात्र तिच्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या पोस्ट काही केल्या थांबत नाही. कंगणानं नुकतीच अमृतसर (Amrutsar) मधल्या गोल्डन टेम्पलला (Golden Temple) भेट दिली. त्या भेटीवरुन तिच्या राजकीय प्रवेशाचे संकेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन भाजपच्या एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. (actress kangana ranaut golden temple visit sparks speculations her political ambitions)

पंजाब विधानसभा (Punjab) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील लोकसभेच्या पोटनिवडणूकांचे संकेत आहे. अशावेळी कंगणाचे त्याठिकाणी जाणे यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहे. याबाबतची अधिक माहिती देणारे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. त्यात एका भाजपच्या नेत्यानं कंगणा येत्या काही दिवसांत राजकीय प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

कंगणाचे अमृतसरला जाणे हे तिच्या आगामी काही चित्रपटांच्या प्रमोशनसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपच्या त्या नेत्यानं असं सांगितलं आहे की, हिमाचल प्रदेश येथून तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात होऊ शकते. कंगणा हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात राहते. त्याठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तेथील खासदार राम स्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केली होती. त्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT