Actress kangana ranaut shares her childhood and speak about her brother death.jpg
Actress kangana ranaut shares her childhood and speak about her brother death.jpg 
मनोरंजन

कंगनाने शेअर केली बालपणीची खास आठवण म्हणाली, ‘आईला आमच्या आधी एक मुल होते पण...’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॅलिवूडमध्ये कोन्ट्रवर्सि क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. सोशल मिडीयावरील बोल्ड वक्तव्यांमुळे कंगना नेहमी चर्चेत असते. अनेक वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बॅलिवूड असो वा राजकारण कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत सोशल मीडियावर मांडते. नुकताच एक खास फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘सिबलिंग डे’ निमित्त कंगनाने तिच्या भावंडांसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कंगनाच्या या थ्रो बॅक फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या फोटोला कंगनाने कॅप्शन दिले, ’आज सिबलिंग डे आहे का? माझ्या आईला आमच्या आधी एक मुलं होते, पण काही कारणास्तव त्याचे निधन झाले. मला असे वाटते की आम्ही तिघं तीन भागांमध्ये विभागलो आहोत. हा हा हा. अशा अनेक विलक्षण उपमा आहेत. या फोटोंमध्ये मला अजोबा नानाजी ठाकूर यांचा कधी न पाहिलेला फोटो सापडला’.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोमधील एका फोटोमध्ये ती तिची बहिण रंगोली आणि भाऊ अक्षतसोबत दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आणि रंगोली दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये कंगनाचे अजोबा आणि पणजोबा दिसत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रंगोलीच्या जन्माआधी आमच्या मोठ्या भावाचा जन्म झाला होता. पण तो आज आपल्यामध्ये नाही असे कंगनाने म्हटले आहे. असे कंगनाने या पोस्टमधून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

कंगनाच्या थलाईवी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘चली चली’ हे गाणे सध्या खूप गाजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Results: नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करणार? ठरणार दुसरे पंतप्रधान?

Jayant Patil : मतमोजणी प्रक्रियेत सावध राहा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना पत्र; फेरफार होण्याची भीती

National Cheese Day 2024 : नाश्त्याला झटपट बनवा चवदार मसाला चीज मॅक्रोनी, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली

India Lok Sabha Election Results Live : दिल्लीच्या भाजप कार्यालयात गोडधोड पदार्थांची रेलचेल

SCROLL FOR NEXT