kareena kapoor due date news 
मनोरंजन

करिनाची 'ड्यु डेट' जाहीर, तैमुरला भाऊ मिळणार की बहीण; चर्चा तर होणारच

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूरच्या प्रेग्नंसीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सोशल मीडियावर ती दररोज वेगवेगळ्या पोझमधले फोटो तिनं शेअर केले आहेत. करिना आणि सैफच्या असंख्य चाहत्यांना गुड न्यूजचे वेध लागले आहेत. सेलिब्रेटींचे विशेषत आपल्या आवडत्या कलाकाराशी संबंधित आनंदाची बातमी ऐकण्यासाठी चाहते आतूर असतात. दोन ते तीन दिवसांपूर्वी करिनानं प्रेग्नंसी पोझमधील काही फोटो शेअर केले होते. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.

करिनाला चार वर्षांचा एक मुलगा आहे त्याचे नाव तैमूर असे आहे. नुकतचं करिनाच्या काकांचे राजीव कपूर यांचे हद्यविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांचे अंत्यदर्शन आणि त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ती आपल्या घरी गेली होती. राजीव कपूर यांचा एक जूना फोटो शेअर करुन करिनानं त्यांना श्रध्दांजली वाहिली होती. 9 फेब्रुवारी रोजी राजीव यांची प्राणज्योत मालवली. करिनानं राजीव यांचा जो फोटो शेअर केला त्यात राज कपूर, त्यांची तीन मुलं रणधीर, ऋषि आणि राजीव कपूर दिसत आहे. राजीव हे तिन्ही भावांमध्ये सर्वात छोटे होते. मागील वर्षी कपूर परिवारानं ऋषि कपूर आणि रितू नंदा यांना भावपूर्ण निरोप दिला होता. रितु ही राज कपूर यांची मोठी मुलगी होती.

सध्या कपूर फॅमिलीवर दु;खाचे सावट आहे. मात्र अशा परिस्थितीत करिनाची प्रेग्नंसीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. आता करिनाची ड्यु डेट जाहीर झाली आहे.  करिनाचे वडिल यांनी या तारखेचा खुलासा केला आहे.  हिंदुस्थान टाईम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार, रणधीर कपूर यांनी करिनाची ड्यु डेट ही 15 फेब्रुवारी असल्याचे सांगितले आहे. करिनाचे हे दुसरे अपत्य असणार आहे.

सैफ आणि करिनानं मागील वर्षी प्रेग्नंसीचे प्लॅनिंग केले होते. ऑगस्टमध्ये त्या दोघांच्या वतीने ऑफिशियल एक स्टेटमेंट जाहिर करण्यात आले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, आमच्या परिवारात एक नवीन सदस्य येतो आहे हे सांगताना आम्हाला फार आनंद होतो आहे. आतापर्यत आमच्या आनंदात सहभागी असणा-या सर्व चाहते, हितचिंतकांचे यानिमित्तानं आम्ही आभार मानतो. करिनानं प्रेग्नंसीच्या दरम्यान आमिरच्या लाल सिंह चढ्ढाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. हा चित्रपट यावर्षी नाताळात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT