actress Kashmira shah replay on Krushna Abhishek post 
मनोरंजन

'तो माझा नवरा आहे, आवडत्या गोष्टीबद्दल बोलणारच'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने गेल्या काही दिवसांपूर्वी आपली पत्नी कश्मिरा शाहच्या एका फोटोवर गंमतीशीर कमेंट दिली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याची ती पोस्ट व्हायरल झाली होती. अनेकांनी त्याला त्याच्याच सारख्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. कृष्णाच्या अशाप्रकारच्या पोस्टमुळे तो नेटक-यांच्या टीकेला सामोरा गेला होता.

आपली बायको एवढी सुंदर दिसत असताना आपण दुस-या स्त्रीकडे कसे पाहु अशा असा अर्थ सुचित करणारी ती पोस्ट आहे. कश्मीराने ब्लॅक लो कट मोनॉकिनीवर नुकतंच फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील एक फोटो कृष्णाने त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला. कश्मीराच्या बोल्ड फोटोच्या कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिलं, ‘जेव्हा तुमच्या घरी बिर्याणी असेल तर तुम्हाला बाहेरची दाल मखनी का हवी असेल? तू तुझ्या ‘हॉट’ अंदाजात पुन्हा आली आहे. कश्मीरा तुझ्यावर मला खूप अभिमान आहे.’ असे त्याने म्हटले होते.

आता त्यावर कश्मिरा शहाने एक पोस्ट शेयर  केली असून त्यात तिने आपल्या नव-याची पाठराखण केली आहे.  या संदर्भात कश्मीराने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, ‘मला ट्रोल करणारे तेच लोकं आहेत जे आधी मला हसायचे. कृष्णाने जी काही कमेंट केली त्या मागच्या भावना तर समजून घ्या ना. कृष्णा माझा नवरा असून त्याला माझ्या ज्या गोष्टी आवडतात त्या विषयी तो बोलणारच’ अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे.

 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. 2013 मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गपचुप लग्न केलं होतं.  कृष्णाने त्याच्या पत्नीचा एक हॉट अंदाजातील फोटो शेयर केला आहे. त्याला त्यानेच गंमतीशीर कमेंट दिली होती.   


  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT