Katrina-Vicky sakal
मनोरंजन

Katrina-Vicky: कतरिना-विक्कीच्या घरी छोटा पाहुणा लवकरच येणार... त्या व्यक्तिने केला बेबी प्लॅनिंगचा खुलासा

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रेमळ कपल आहेत.

Aishwarya Musale

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रेमळ कपल आहेत. या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्याचवेळी, कॅट आणि विकीच्या लग्नानंतर, विकी आणि कतरिना कधी आई-वडील होणार हे जाणून घेण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

अखेर या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. मात्र, याचा खुलासा कॅट आणि विकीने नाही तर त्यांच्या एका खास मित्राने केला आहे.

कतरिना कैफच्या बेबी प्लॅनिंगबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ठरवले आहे की फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर ते बेबी प्लॅनिंग करतील.

रिपोर्टनुसार, कतरिनाने तिच्या मैत्रिणींना सांगितले आहे की, "विजय सेतुपती आणि फरहान अख्तरसोबत चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केल्यानंतरच मी बेबी प्लॅनिंग करेन." म्हणजेच लवकरच विकी आणि कॅट गुड न्यूज देणार आहेत.

'जी ले जरा' हा चित्रपट अजून सुरू झाला नसला तरी तो लवकरच होऊ शकतो. या चित्रपटात आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचवेळी, मेरी ख्रिसमसमध्ये कॅटरिना कैफ विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. 'टायगर 3'मध्ये इमरान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सने बनवला असून त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट यशराजच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे आणि त्याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT