lara dutta. lara dutta news. lara dutta birthday, lara dutta miss universe, lara dutta movies SAKAL
मनोरंजन

Lara Dutta Birthday: पहिलाच सिनेमा ठरला असता अखेरचा.. अजूनही तो प्रसंग आठवला की घाबरते लारा..

2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लारा रातोरात प्रसिद्ध झाली

Devendra Jadhav

Lara Dutta Birthday News: बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. अनेक सिनेमांमधून गंभीर याशिवाय विनोदी भूमिका साकारून लाराने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

आज सौंदर्यवती लारा तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करतेय. लाराने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमधून लोकप्रियता मिळाली असली तरीही तिच्या पहिल्याच सिनेमात लाराचा जीव धोक्यात आला होता. काय घडलं होतं नेमकं पाहूया..

(actress Lara dutta life in danger during the shooting of the first film andaaz with akshay kumar)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

लाराने तिच्या आजवरच्या बॉलिवूड प्रवासात 'नो एंट्री', पार्टनर', 'मस्ती', 'भागम भाग', 'हाऊसफुल', 'चलो दिल्ली' असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. लाराने 2003 मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तसेच, यासाठी लाराला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

काय होती ती घटना?

अंदाज सिनेमाचं शूटिंग करत होतं. सिनेमातील एका गाण्याचं शूटिंग समुद्रकिनारी सुरु होतं. त्यावेळी शूटिंग सुरू असताना समुद्राच्या जोरदार लाटांमुळे लाराचा तोल गेला आणि ती पाण्यात वाहून गेली. पुढे अक्षय कुमारने तात्काळ पाण्यात उडी मारून तिचा जीव वाचवला.

हा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यामुळे लाराचा पहिलाच सिनेमा अखेरचा ठरला असता.

2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लारा रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या या विजेतेपदामागील कथाही खूप रंजक आहे.

ही स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम फेरीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात आला होता आणि स्पर्धकांच्या उत्तरांच्या आधारे विजेत्याचा निर्णय घ्यायचा होता.

असाच एक अवघड प्रश्न लारा दत्ताला विचारण्यात आला, ज्याचे तिने इतक्या सुंदर पद्धतीने उत्तर दिले की तिला स्पर्धेची विजेती घोषित करण्यात आली.

लाराला प्रश्न विचारण्यात आला, 'मिस युनिव्हर्स स्पर्धेत महिलांचा अपमान होत असल्याने निषेध केला जात आहे. ते चुकीचे आहेत हे तुम्ही तुमच्या विरोधकांना कसे पटवून द्याल."

यावर उत्तर देताना लारा म्हणाली की, मला वाटते की अशा स्पर्धांमुळे आमच्यासारख्या तरुण महिलांना व्यवसाय, सशस्त्र दल किंवा राजकारणात पुढे जाण्यास मदत होते.

लाराचे हे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या परीक्षकांना खूप आवडले.. ज्यामुळे तिने बाकीच्या स्पर्धकांना मागे टाकून मिस इंडियाचे विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT