actress madhurani prabhulkar special experience from aai kuthe kay karte serial SAKAL
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: "मला मायग्रेनचा त्रास आणि त्यात...", मधुराणीने सांगितला शुटींगचा भन्नाट अनुभव

मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते मधील शुटींगचा भन्नाट अनुभव सांगितला आहे

Devendra Jadhav

Madhurani Prabhulkar News: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरली आहे. आई कुठे काय करते मालिका गेली ४ हून अधिक वर्ष TRP मध्ये अव्वल आहे.

या मालिकेमध्ये आजवर अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले. पण मालिका कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आई कुठे काय करते मधील अनेक कलाकार त्यांचे शुटींगचे अनुभव शेअर करत असतात. अशातच आई कुठे काय करते मधील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकताच सोशल मीडियावर एक अनुभव शेअर केलाय.

आई कुठे काय करते मालिकेतील एक व्हिडीओ मधुूराणीने पोस्ट केलाय. यात अरुंधती अंगाई गात बाळाला झोपवताना दिसतेय.

मधुराणी लिहीते, "Daily soap म्हणजे जवळपास रोजच शूटिंग. आणि त्यात एखादा दिवस म्हणजे परीक्षा असते.

मला ह्या गाण्याचं शूट करायचं होतं त्यादिवशी प्रचंड मायग्रेन चा त्रास होत होता . पण काम करणं प्राप्त होतं.
सेटवर गेल्यावर मला ' ही ' अंगाई गायची आहे हे समजलं. सलीलच्या चाली गायला अवघड असतात."

मधुराणी पुढे लिहीते, "ती बसवायची आणि लाईव्ह गायची इतकं डोकं ठणठणत असताना.. म्हणजे मला अजूनच टेन्शन आलं.
पण संदीपच्या शब्दात आणि सलीलच्या चालीत जादू असते.

जसं मी गाणं गुणगुणायला लागले तसं मला शांत वाटायला लागलं आणि गाण्यात त्या बाळाला मी थोपटत आहे खरी पण मनात मी स्वतःला जणू जोजवत होते.
संगीताची जादू ती हीच."

आई कुठे काय करते मालिका सध्या TRP मध्ये टॉपला आहे. आई कुठे काय करते मालिकेमधली अरुंधती, अनिरुद्ध, संजना, अनघा, यश अशा अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

आई कुठे काय करते मालिका सोमवार - शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT