actress madhuri dixit give every women best offer to celebrate makarsankrant with her  SAKAL
मनोरंजन

Madhuri Dixit: महिलांनो! माधुरी दीक्षितसोबत मकरसंक्रांत साजरी करायचीय? मग आताच करा ही गोष्ट

माधुरी दीक्षितसोबत मकरसंक्रांतीला हळदीकुंकू साजरं करायचं असेल तर करा ही गोष्ट

Devendra Jadhav

Madhuri Dixit News: स्वतःच्या सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी सध्या पंचक सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. पंचक या मराठी सिनेमाती निर्मिती माधुरीने केलीय.

माधुरी सध्या पंचकच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. यानिमित्ताने माधुरीने तिच्या चाहत्यांसाठी एक खास संधी आणलीय. महिलावर्गाला माधुरीला भेटण्याची संधी मिळणार आहे. कसं? आम्ही सांगतो.

मराठमोळ्या माधुरी दीक्षितला भेटण्याची इच्छा अनेकांना असते. आता हे स्वप्न ‘पंचक’च्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे.

कारण स्वतः माधुरी दीक्षित यांनी सांगितलं आहे की, “खूप छान वाटते, जेव्हा चाहते माझ्या अभिनयाचे, नृत्याचे आणि हास्याचे कौतुक करतात. अनेक जण मेसेजेस करतात, अनेक जण भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. परंतु या सगळ्यांना भेटणे शक्य होत नाही. त्यामुळेच आमचा ‘पंचक’ चित्रपट नवीन वर्षात ५ जानेवारी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. जेणे करून मी माझ्या मैत्रिणींना भेटू शकेन.

माधुरी पुढे म्हणाली, "यावेळी महाराष्ट्रातील निवडक १०१ मैत्रिणींना मी ठाण्यात भेटून, त्यांच्यासोबत हळदी कुंकू साजरे करणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे. ‘पंचक’ या चित्रपटाचे तिकीट बुक करून चित्रपटगृहात जाऊन आपला आणि तिकिटाचा फोटो काढून ‘पंचक’च्या अधिकृत इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार आहे, माझ्या आणि ‘पंचक’मघील खोतांच्या घरातील महिलांसोबत हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याची. तर मग भेटुयात लवकरच."

‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने यांनी केली असून राहुल आवटे आणि जयंत जठार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

या सिनेमात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे. पंचक ५ जानेवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Stomach Bloating: पोटफुगीची समस्या कशी कमी करावी? डॉक्टरांनी सांगितले 5 प्रभावी उपाय

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

SCROLL FOR NEXT