actress malaika arora dance in gym during workout video viral on internet 
मनोरंजन

मलायका वर्कआऊट करतेय, पाहणार नाही ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - फिटनेसच्याबाबत बॉलीवूडमध्ये ज्या सेलिब्रेटींची नावं घ्यावी लागतील त्यात मलायकाचं नाव सर्वात अगोदर घ्यावे लागेल. तिनं आपल्या वेगळेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. त्याचा तिला होणारा फायदा मोठा आहे. यामुळे तिचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. याशिवाय काही शो मध्ये ती परिक्षकाच्या भूमिकेतही असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे मलायकाच्या ग्लॅमरमध्ये आणखी वाढ झाली आहे. सध्या तिचा जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

जीममध्ये वर्कआऊट करताना मलायकानं डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ लोकप्रिय होताना दिसत आहे. सध्या बॉलीवूडमध्ये फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देणारी सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव घेता येईल. ती तिच्या डान्ससाठीही प्रसिध्द आहे. तिचे डान्सचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. विशेषत; मलायका ज्यावेळी जीममध्ये वर्कआऊट करते तेव्हा तिच्या व्हायरल होणा-या फोटोंना आणि व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. आता तिनं जीममध्ये व्यायाम करताना डान्स केला आहे. मलायकाचा तो अंदाज फॅन्सला जाम आवडला आहे. त्यांनी लाईक्स करुन प्रतिक्रिया देऊन मलायकाचं कौतूक केलं आहे.

मलायकानं आता जो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यात ती एका इंग्लिश गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, अशाप्रकारे मी माझ्या वीक एंडची सुरुवात केली आहे. विगल. मला माहिती आहे की, तुम्हालाही माझा व्हिडिओ फार आवडला आहे. तुम्हीही माझा व्हिडिओ आणखी शेअर करा. मलायकाच्या त्या व्हिडिओला 3 लाखांपेक्षा जास्त व्हयुज मिळाले आहेत.

 नृत्याच्या माध्यमातून मलायकानं आपली ओळख निर्माण केली होती. ती सध्या बॉलीवूडमधील उत्तम डान्सर  आहे. छैय्या, छैय्या, अनारकली, मुन्नी बदनाम हुई सारख्या गाण्यांमधील तिच्या नृत्यानं सर्वांना वेड लावले होते. नृत्याबरोबरची ती आपल्या लुक्स आणि स्टाईलसाठीही प्रसिध्द आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC : इशान किशनचा रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध 'तोडफोड' फटकेबाजी, मोडला गौतम गंभीरचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

Ishan Kishan : ईशान किशन लवकरच विवाहबंधनात? आजोबांनी दिले संकेत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

Dharashiv Crime : कला केंद्राच्या छम छम मुळे पुन्हा एकाचा खुन; महाकाली कलाकेंद्राच्या न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे जिल्हाप्रशासन हातबल

Horoscope Prediction : यंदाचा शिमगा 5 राशींना जाणार अत्यंत सुखात ! होळीपूर्वीच येणार सोन्याचे दिवस, पैशांची भरभराट

SCROLL FOR NEXT